नील नितिन मुकेशच्या आगामी चित्रपटाचे पोस्टर रिलीज


लवकरच ‘बायपास रोड’ या चित्रपटाच्या माध्यमातून अभिनेता नील नितीन मुकेश प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. या चित्रपटाची निर्मिती त्याच्याच प्रोडक्शन हाऊसमध्ये करण्यात येणार आहे. नुकताच या चित्रपटाचा फर्स्ट लूक रिलीज करण्यात आला आहे.


आत्तापर्यंत बॉलिवूडमधील बऱ्याच चित्रपटांमध्ये नील नितीन मुकेशने काम केले आहे. त्याचबरोबर तो लवकरच प्रभास आणि श्रद्धा कपूरसोबत ‘साहो’ चित्रपटात झळकणार आहे. त्यानंतर तो लगेचच ‘बायपास रोड’ या चित्रपटात दिसणार आहे. नमन नितिन मुकेश हे या चित्रपटाचे दिग्दर्शन करणार आहेत. तर, मिराज ग्रुप आणि एनएनएम फिल्म्स अंतर्गत या चित्रपटाची निर्मिती करण्यात येत आहे.

हा चित्रपट एक अॅक्शन थ्रिलरपट असणार आहे. यामध्ये कोणत्या अभिनेत्रीची वर्णी लागणार आहे, हे अद्याप गुलदस्त्यात आहे. चित्रपट समीक्षक तरण आदर्श यांनी या चित्रपटाबाबतची माहिती सोशल मीडियावर शेअर केली आहे.

Leave a Comment