‘मेंटल है क्या’ चित्रपटाचे मोशन पोस्टर रिलीज


लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला अभिनेत्री कंगना राणावत आणि राजकुमार राव यांची जोडी असलेला ‘मेंटल है क्या’ हा चित्रपट येणार आहे. या चित्रपटाचे मोशन पोस्टर नुकतेच रिलीज करण्यात आले आहे. कंगना आणि राजकुमार रावचा रॉयल अंदाज या मोशन पोस्टरमध्ये पाहायला मिळत आहे.

त्याचबरोबर या चित्रपटाची रिलीज डेट देखील जाहीर करण्यात आली आहे. हा चित्रपट येत्या २१ जूनला रिलीज होणार आहे. एकता कपूरने या चित्रपटाची निर्मिती केली आहे. तर, प्रकाश कोवेलामुडी यांनी दिग्दर्शन केले आहे. या चित्रपटाच्या निमित्ताने राजकुमार आणि कंगना दुसऱ्यांदा एकत्र येत आहेत. ते यापूर्वी ‘क्विन’ चित्रपटात एकत्र झळकले होते.


याबाबत एका माध्यमाने दिलेल्या वृत्तानुसार, कंगनापूर्वी या चित्रपटात करिना कपूर खानची निवड करण्यात आली होती. पण करिनाने नकार दिल्यानंतर यामध्ये कंगनाची वर्णी लागली. २१ जून रोजी शाहिद कपूरचा ‘कबीर सिंह’ हा चित्रपटदेखील प्रदर्शित होणार असल्यामुळे प्रेक्षक आता कोणत्या चित्रपटाला कसा प्रतिसाद देतात, हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.

Leave a Comment