आठवलेंच्या कविता आणि संसदेत फुटले हास्याचे कारंजे


नवी दिल्ली : संसदेत सध्या लोकसभेचे कामकाज सुरु असून नव्या अध्यक्षांची निवडही झाली आहे. प्रत्येक पक्षाचा नेता ओम बिर्ला यांना शुभेच्छा देण्यासाठी सभागृहात भाषण देत आहे. त्यात संसदेत काही अशीही भाषणे झाली, ज्यांनी लक्ष वेधून घेतले. आज सभागृहात आपल्या अंदाजात केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनीही भाषण केले. त्यांनी यावेळी देखील कविता केलीच पण असेही काहीतरी बोलले की सभागृहात हास्याचे कांरजे फुटले. पंतप्रधान नरेंद्र मोदी, यूपीए अध्यक्ष सोनिया गांधी, काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधीसह सभागृहातील प्रत्येक सदस्य पोट धरुन हसत होते. रामदास आठवले यांनी लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांना शुभेच्छा देताना नेहमीप्रमाणे सभागृहात कविता ऐकवली, जी ऐकल्यानंतर कोणालाही आपले हसू रोखता आले नाही.

आठवले यांनी म्हटलेली कविता
“एक देश का नाम है रोम, लोकसभा के अध्यक्ष बन गए बिर्ला ओम
लोकसभा का आपको अच्छी तरह चलाना है काम, वेल में आने वालों का ब्लॅक लिस्ट में डालना है नाम
नरेंद्र मोदी और आपका दिल है विशाल, राहुल जी आप रहो खुशहाल
हम सब मिलकर एकता की मशाल, भारत को बनाते हैं और भी विशाल
आपका राज्य है राजस्थान, लेकिन लोकसभा की आप बन गए शान
भारत की हमें बढ़ानी है शान, लोकसभा चलाने के लिए आप हैं परफेक्ट हैं मैन

काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देताना आपल्या भाषणात रामदास आठवलेंनी कोपरखळीही मारली. ते म्हणाले की, आता आम्ही तुम्हाला सत्तेत येऊ देणार नाही. मोदी सरकार पाच वर्षांनंतर पुन्हा निवडणूक जिंकणार असे म्हटले. राहुल गांधी यावेळी सभागृहातच उपस्थित होते आणि ते आठवलेंच्या भाषणादरम्यान हसतही होते.

तुमचे सरकार जेव्हा होते, मी तेव्हा तुमच्यासोबत होतो, असे आठवले बोलताच सभागृहात हास्यकल्लोळ झाला. काँग्रेसवाले निवडणुकीआधी आमच्याकडे या असे बोलत होते. परंतु मी वाऱ्याची दिशा ओळखली होती की मोदींची हवा आहे, आठवलेंच्या या वाक्यानंतरही सगळेच हसू लागले.

Leave a Comment