सनी देओलच्या खासदारकीवर गदा येण्याची शक्यता


नवी दिल्ली – गुरदासपूरचे भाजपचे खासदार सनी देओल यांना लोकसभा सदस्यतेवर गदा येण्याची शक्यता आहे. सनी देओल यांच्यावर लोकसभा निवडणुकीत जास्त खर्च करण्याचा आरोप करण्यात येत आहे. या प्रकरणात निवडणूक आयोगाला काही कागदपत्रे मिळाली आहेत. या आधारावर निवडणूक आयोग जारी करण्याचा विचार करीत आहे.

निवडणूक आयोगाला मिळालेल्या कागदपत्रांनुसार, सनी देओल यांनी निवडणुकीच्या काळात 86 लाख रुपये खर्च केले आहेत, तर मर्यादा 70 लाखांची आहे. निवडणूक आयोगाच्या म्हणण्यानुसार, निश्चित मर्यादेपेक्षा जास्त खर्च केल्यानंतर संबंधित उमेदवाराविरोधात कठोर कारवाई केली जाईल.
आयोगाच्या नियमांनुसार, एखादा उमेदवार मर्यादेपेक्षा जास्त पैसे खर्च करुन विजयी झाला आणि त्यानंतर त्याने खर्च केलेल्या पैशांचे विवरण सापडले तर आयोग विजयी उमेदवाराची खासदारकी रद्द करू शकते आणि दुसऱ्या क्रमांकावर असलेल्या उमेदवाराला विजयी घोषित करु शकते. म्हणजे येथे कारवाई करण्यासाठी एक तरतूद आहे.

याआधी, निवडणुकीच्या प्रचारादरम्यान, सनी देओलवर आचारसंहितेचा भंग केल्याचा आरोप केला होता, त्यानंतर निवडणूक आयोगाने त्याला नोटिस जारी केले होते. निवडणूक प्रचाराच्या अखेरीस त्यांनी संध्याकाळी 5 वाजता एक जनसभा संबोधित केली, त्यानंतर त्यांना नोटीस जारी करण्यात आली.

देओलने लोकांना संबोधित करण्यासाठी मायक्रोफोनचा वापर केला. गुरदासपूरकडून जिंकलेल्या सनी देओल यांनी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुनील जाखर यांना पराभूत केले. या निवडणुकीत सनी यांना 558719 मते मिळाली. तर जाखर यांना 476260 मते मिळाली. सनी देओल यांचे लोकसभा निवडणुक गमावल्यानंतर पंजाबचे काँग्रेस अध्यक्ष सुनील जाखर यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला होता.

Leave a Comment