तुम्ही पाहिला आहे 20 नंबरचा ‘महाबूट’?


सर्व साधारणपणे आपल्याकडे जास्तीत जास्त 12 नंबरचा बूट किंवा चप्पल पाहिली असेल पण बुलडाणा जिल्ह्यातील बोथा-काजी या गावातील सुरेश गावडे या शेतकऱ्याच्या शेतातील विहिरीमधील गाळ काढताना दिड फूट लांबीचा म्हणजे २० नंबरचा बूट सापडल्यामुळे सर्वसाधारणपणे बुटांच्या दुप्पट आकाराचा हा बूट कोण वापरत असावे? याबाबत विविध चर्चांना शहरात उधाण आले आहे.

१२ नंबर पेक्षा मोठ्या नंबरच्या बूट किंवा चपला बाजारात किंवा दुकानात उपलब्ध नाहीत. कारण एवढ्या मोठ्या नंबरचे बूट किंवा चपला कंपन्या तयारच करत नाहीत. शिवाय कोणाचेही एवढे मोठे पाय नसतातही. पण यापेक्षा दुप्पट म्हणजे २० नंबरचा बूट सापडल्याने तो माणूस कसा असेल? तो कसा दिसत असेल? त्याचा पाय केवढा असेल? अशी कल्पना सध्या बुलडाण्यातील नागरिक करत आहेत. सगळेचजण विहिरीतील गाळ काढताना सापडलेला हा बूट पाहून आश्चर्यचकित झाले आहेत. सामान्य माणसाचा बूट या दीड फुटाच्या बुटासमोर अगदीच छोटा दिसतो.

Leave a Comment