चक्क उर्वशी रौतेलाच्या बाहुपाशात विराट कोहली


सध्या सिनेसृष्टीपासून अभिनेत्री उर्वशी रौतेला काहीशी लांबच आहे. पण ती आपल्या स्टाईल आणि फॅशन सेन्समुळे कायमच चर्चेत असते. सध्या तिचा एक फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. हा फोटो भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार विराट कोहली याच्यासोबतचा असून तिने यात विराटला चक्क आपल्या बाहुपाशात घेतले आहे. तिच्या या फोटोवर नेटकऱ्यांच्या कॉमेंट्सचा पाऊस पडत आहे.


हा व्हायरल झालेला विराट कोहली आणि उर्वशी रौतेला यांचा फोटो पूर्ण खरा नाही. यात तिने विराटला आपल्या बाहुपाशात घेतल्याचे दिसत असले तरी तो विराटचा मेणाचा पुतळा आहे. हा पुतळा हुबेहुब दिसत असल्यामुळे अनेकांचा गोंधळ होणे स्वाभाविक आहे. फोटो उर्वशीने पोस्ट केल्यानंतर तब्बल १० लाख लोखांनी याला लाईक केले आहे. विराट आणि उर्वशीच्या या फोटोवर भरपूर कॉमेंट्स आल्या आहेत. एक युझर ने लिहिले आहे की, तुला काय विराटचा घटस्फोट करायचा आहे का ?, तर दुसऱ्या युझरने कॉमेंटमध्ये लिहिले आहे की, तुझा पत्ता अनुष्काला हवा आहे.

उर्वशी रौतेला अभिनेत्री आहेच पण ती एक उत्तम मॉडेल देखील आहे. तिने सनी देओलसोबत ‘सिंह साब द ग्रेट’ चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केल्यानंतर तिने ‘सनम रे’, ‘ग्रेट ग्रँड मस्ती’ और ‘हेट स्टोरी 4’ या चित्रपटात भूमिका साकारल्या आहेत. त्याचबरोबर ती एक उत्तम नृत्यांगणाही आहे. तिने अलिकडेच ‘अर्बन फिटेस्ट वुमन ऑफ द ईयर’ हा किताब मिळवला आहे.

Leave a Comment