मुख्यमंत्री कमलनाथांचे शिवराज सिंह चौहानांकडून कौतुक


भोपाळ – मध्य प्रदेशचे विद्यमान मुख्यमंत्री कमलनाथ यांचे ट्विटरवरून माजी मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान यांनी कौतुक केले आहे. शिवराज सिंह चौहान यांनी कमलनाथांचे आदिवासी समाजाच्या मागण्या मान्य केल्याबद्दल आभार मानले आहे.

माजी मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान यांच्या नेतृत्वात मंगळवारी आदिवासींचा मोर्चा काढण्यात आला होता. शिवराज सिंह चौहान यांनी यावेळी आदिवासींच्या मागण्यांसाठी मुख्यमंत्री कमलनाथ यांची भेट घेतली. शिवराज सिह यांनी या भेटीवेळी केलेल्या मागण्या कमलनाथ यांनी मान्य केल्या. यानिमित्त शिवराज सिंह यांनी खास ट्विट करत कमलनाथांचे कौतुक केले. तसेच त्यांचे आभारही मानले.


आपल्या ट्विटमध्ये त्यांनी म्हटले की, मुख्यमंत्र्यांनी विनाअट आदिवासींच्या सर्व मागण्या मान्य केल्यामुळे सर्व आदिवासी बांधव खुश आहेत. मी आदिवासी बांधवांना हे आंदोलन यशस्वी झाल्याने शुभेच्छा देतो. मुख्यमंत्री कमलनाथ यांचेही मी मागण्या मान्य केल्याबद्दल आभार मानतो. या मागण्या मान्य झाल्याच्या आनंदात शिवराज चौहान यांनी वियजी रॅली देखील काढली आहे.

Leave a Comment