‘बीएसएनएल’चा १५१ रुपयांचा ‘अभिनंदन’ प्लान


नवी दिल्ली : १५१ रुपयांचा नवीन प्लान ‘भारत संचार निगम लिमिटेड’ने लॉन्च केला आहे. भारताचे विंग कमांडर अभिनंदन वर्धमान यांचे नाव या प्लानला देण्यात आले आहे. हा प्लान ‘Abhinandan 151’ अशा नावाने लॉन्च करण्यात आला आहे. २४ दिवसांची या प्लानची वैधता असेल. यूजर्सना या प्लानमध्ये दररोज १ जीबी डेटा आणि १०० एसएमएस मिळणार आहेत. २४ दिवसांपर्यंत लोकल, एसटीडी आणि रोमिंग कॉल मोफत देण्यात आले आहेत. २४ दिवसांनंतर १८० दिवसांसाठी इनकमिंग सुविधा मोफत देण्यात आली आहे.

बीएसएनएल यूजर्सना हा प्लान सबस्क्राईब करण्यासाठी आपल्या फोनवरुन PLAN 151 टाईप करुन तो १२३ वर सेंड केल्यास या प्लानची सुविधा लागू होईल. चेन्नई आणि तमिळनाडू भागासाठी हा प्लान लॉन्च करण्यात आला आहे. परंतु दिल्ली आणि मुंबईतील वापरकर्तेही या प्लानचा फायदा घेऊ शकतात.

Leave a Comment