‘या’ चार संघांना मिळू शकते उपांत्य फेरीचे तिकिट !


लंडन : आयसीसी विश्वचषक स्पर्धेत प्रत्येक संघाने आतापर्यंत 4 सामने खेळले असल्यामुळे आता उपांत्य फेरी गाठण्यासाठी सर्व देश झगडत आहे. यंदाच्या विश्वचषक स्पर्धेत रॉबीन राऊंड पध्दतीचा वापर होत असल्यामुळे प्रत्येक संघाचे 9 सामने होणार आहेत. यानंतर गुणतालिकेत पहिल्या चार क्रमांकावर असलेले संघ उपांत्य फेरी गाठतील. त्यामुळे आता उपांत्य फेरीत कोणते चार संघ खेळतील याबद्दल याचे तर्क वितर्क लावण्यास सुरुवात झाली आहे.

ऑस्ट्रेलिया, श्रीलंका, दक्षिण आफ्रिका, पाकिस्तान, वेस्ट इंडिज आणि बांगलादेश या संघांनी आतापर्यंत 5 सामने खेळले आहेत. तर, न्यूझीलंड, भारत, इंग्लंड, अफगाणिस्तान यांनी 4 सामने खेळले आहेत. सध्या गुणतालिकेत ऑस्ट्रेलियाचा संघ 8 गुणांसह पहिल्या क्रमांकावर आहे तर, भारताचा संघ 7 गुणांसह तिसऱ्या क्रमांकावर आहे. इंग्लंड 6 गुणांसह चौथ्या क्रमांकावर आहे.

सध्या विश्वचषक स्पर्धेतील लीग स्टेजचे सामने सुरु आहेत. त्यानंतर 9 जुलैपासून नॉक आऊट सामने सुरु होणार आहेत. 9 जुलैला मॅंचेस्टरमध्ये पहिला उपांत्य फेरी सामना होईल तर दुसरा सामना 11 जुलैला बर्मिंघममध्ये होईल. अंतिम सामना 14 जुलै रोजी लॉर्डसवर होणार आहे.

गुणतालिकेत सध्या ऑस्ट्रेलिया, भारत, न्यूझीलंड आणि इंग्लंड हे संघ पहिल्या चार क्रमांकावर असल्यामुळे या चार संघांना उपांत्य फेरीचे तिकीट मिळू शकते. आतापर्यंत 4 सामने भारताने खेळले आहेत. यातील एक सामना पावसामुळे रद्द झाला असल्यामुळे भारताचे आता 7 गुण आहेत. बांगलादेश, वेस्ट इंडिज, अफगाणिस्तान आणि श्रीलंका यांच्याविरोधात भारताचे पुढील सामने होणार आहे. यातील इंग्लंड विरुद्धचा सामना भारतासाठी कठिण असेल. दक्षिण आफ्रिका, ऑस्ट्रेलिया आणि पाकिस्तान यांना भारताने नमवले आहे तर न्यूझीलंड विरुद्धचा सामना पावसामुळे रद्द झाला होता.

Leave a Comment