”द 2015 हिमालय निलोटिक्स क्रोकोडाइल बिर्किन 35″ चा 1.44 कोटींमध्ये लिलाव


लंडन- तब्बल 1.44 कोटी रूपयांमध्ये जगातील सर्वात महागड्या हँडबॅग्समध्ये समावेश असलेल्या ‘हर्मीस बिर्कीनच्या’ एका पर्सचा लिलाव करण्यात आला आहे. ”द 2015 हिमालय निलोटिकस क्रोकोडाइल बिर्किन 35” असे नाव या बॅगला दिले गेले आहे. लिलाव करण्याऱ्या क्रिस्टीने घराने याची किंमत सुमारे 88 हजार 793 ते 1 लाख 14 हजार 162 डॉलर ठेवली होती.

त्यामुळे ही हँडबॅग आता जगातील दुसरी सर्वात महागडी हँडबॅग ठरली आहे. पण याच कंपनीच्या नावावर सर्वात महाग हँडबॅगचाही विक्रम आहे. कारण, 2018 मध्ये ‘द मॅट हिमालय निलोटिकस क्रोकोडाइल बिर्किन’ नावाचे हँडबॅगचा तब्बल 3 लाख 322 डॉलरमध्ये लिलाव झाला होता. जवळपास 41 देशांनी त्यामध्ये बोली लावली होती. प्रसिद्ध गायक आणि अभिनेता जेन बिर्कीन यांच्या नावावरुन या पर्सचे नाव ठेवण्यात आले आहे. तसेच, हा ब्रँड हॉलिवूड सेलिब्रिटीमध्ये खूप लोकप्रिय आहे.

Leave a Comment