अॅडोबचे हे नवीन टूल ओळखणार फोटोशॉप आणि एडिट केलेले फोटोज


आपला फोटो अधिक सुंदर दिसण्यासाठी आपण तो फोटो एडिट करण्यासाठी एडिटींग सॉफ्टवेअर्स आणि त्या संदर्भातील अॅप्सचा वापर मोठ्या प्रमाणावर करतो. पण या सुविधेमुळे खरा फोटो ओळखणे अनेकदा कठीण होते. अॅडोबने यासाठीच एक खास टूल तयार केले असून एडिट किंवा फोटोशॉप केलेला फोटो याद्वारे ओळखणे शक्य होणार आहे. या टूलचे नाव आर्टिफिशिअल इंटेलिजेंस Artificial Intelligence (AI) असे असून चेहऱ्यात एडिटिंगमुळे केलेले बदल यामुळे ओळखता येणार आहेत.

अॅडोबने हे नवे टूल युनिर्व्हसिटी ऑफ कॅलिफोर्निया, बर्कलेतील संशोधकांच्या सहकार्याने तयार केले आहे. या नव्या टूलमुळे फेक, एडिटेड फोटो ओळखण्याची अडचण दूर होणार आहे. तसेच फोटो, व्हिडिओ, ऑडिओ यात करण्यात आलेले एडिटिंग देखील या टूलद्वारे ओळखता येणार आहे.

फोटोमध्ये करण्यात आलेले बदल ‘फेस अवे लिक्विफाय’ या फिचरच्या मदतीने पाहणे शक्य होणार आहे. चेहऱ्याचा आकार, ओठ, डोळे व्यवस्थित करण्यासाठी या फिचरचा वापर करण्यात येतो. या टूलच्या मदतीने चेहऱ्यात करण्यात आलेले बदल ओळखता येतील.

Leave a Comment