सानिया मिर्झाने ‘त्या’ प्रकरणावरुन वीणा मलिकला झापले


मँचेस्टर : विश्वचषक स्पर्धेत भारतीय संघाने पाकिस्तानला हरवण्याची परंपरा कायम राखत रविवारी झालेल्या सामन्यात पाकिस्तानचा 89 धावांनी पराभव केला. या स्पर्धेत पाकिस्तानने भारताला एकदा ही हरवलेले नाही. पण पाकिस्तानी संघ भारत विरुद्धच्या सामन्याच्या आदल्या रात्री एका नाईट क्लबमध्ये मौजमजा करतानाचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. या व्हिडिओमध्ये टीमसोबत शोएब मलिकची पत्नी आणि भारताची टेनिसपटू सानिय मिर्झाही दिसत होती. क्रिकेटप्रेमींनी हा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर सोशल मीडियावर पाकिस्तानी क्रिकेट संघाची येथेच्छ धुलाई केली.

पाकिस्तानी खेळाडू आपल्या पत्नींसोबत मँचेस्टरच्या प्रसिद्ध शीशा नाईट क्लबमध्ये गेले होते. तिथे त्यांनी मौज-मस्ती केली. व्हिडीओमध्ये काही पाकिस्तानी खेळाडू हुक्का पितानाही दिसत आहेत. हा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर आमच्यासोबत आमची मुलेही होती हे आमच्या खासगी आयुष्यावर अतिक्रमण आहे, असे मत सानिया मिर्झाने व्यक्त केले होते.


आता या सगळ्या प्रकरणात पाकिस्तानची मॉडेल वीणा मलिकने देखील उडी घेतली आहे. वीणाने यावर एक ट्विट करत, तुमच्यासोबत गेलेल्या मुलांची मला भीती वाटत आहे. शीशी नाईट क्लबमध्ये तुम्ही तुमच्या मुलांना घेऊन गेलात ? माझ्या माहितीप्रमाणे ज्या क्लबमध्ये तुम्ही गेलात तिथे जंक फुड मिळते आणि ते तुमच्या मुलांसाठी योग्य आहे का? तु स्वत: एक आई आणि खेळाडू आहे, हे तुला माहित पाहिजे, असा निशाना साधला.


व्हायरल व्हिडिओ प्रकरणावरुन भडकलेल्या सानिया मिर्झाने वीणा मलिकला प्रत्युत्तर देत, पाकिस्तान क्रिकेट संघाची मी आई नसल्याचे म्हटले. त्याचबरोबर वीणा, मी माझ्या मुलाला तिकडे घेऊन गेले नव्हते. माझ्या कुटुंबियांसोबत मी कुठे जायचे आणि कुठे नाही, हा निर्णय सर्वस्वी आमचा आहे. माझ्या मुलाची मला तुमच्या सर्वांपेक्षा जास्त काळजी आहे. त्यानंतर तिने मी पाकिस्तान क्रिकेट संघाची आई किंवा शिक्षिका नसल्याचेही म्हटले आहे.

Leave a Comment