आयएसआय एजंट विरोधात बोलणे पाकिस्तानी ब्लॉगरला पडले महागात


इस्लामाबाद: पाकिस्तानी लष्कर आणि इंटर-सर्व्हिसेस इंटेलिजेंस (आयएसआय) एजन्सीवर टीका करणाऱ्या 22 वर्षीय सोशल मीडिया कार्यकर्ते आणि ब्लॉगर मोहम्मद बिलाल खान याची अज्ञात हल्लेखोरांनी हत्या केली. डॉनने वृत्तपत्राने अधीक्षक सदर मलिक नायम यांच्या हवाल्याने सांगितले की, बिलाल आपल्या चुलतभावाबरोबर 16 जून रोजी इस्लामाबादच्या बाराहाही भागातून जी-9 वर जाण्यासाठी फोन आला होता. तिथे एक माणूस त्याला जंगलात घेऊन गेला. यानंतर बिलाल आणि त्याच्या चुलत भावावर चाकूने हल्ला केला.

या हल्ल्यात बिलालचा मृत्यू झाला, तर त्याचा चुलत भाऊ गंभीर जखमी झाला. सोमवार (17 जून) सकाळी बिलाल याच्यावर अंतिम संस्कार करण्यात आले. ट्विटरवर ब्लॉगर बिलालचे 16 हजार फॉलोअर आहेत. तर युट्यूबवर 48 हजार सदस्य आहेत आणि 22 हजार लोक फेसबूकवर फॉलो करतात.

बिलालचे वडील अब्दुल्ला यांच्या मते, त्यांच्या मुलाच्या शरीरावर एक धारदार हत्याराचे निशान होते. त्याचबरोबर या घटनेमुळे परिसरातील लोकांच्या मनात भीती निर्माण झाली आहे. अब्दुल्ला यांनी आपल्या मुलाची हत्या करणाऱ्यावर कठोर कारवाई करण्याची मागणी केली आहे. पाकिस्तानातील इतर माध्यमांनी दिलेल्या वृत्तानुसार बिलाल खान हे मुक्त स्वतंत्र पत्रकार होते. त्याची हत्या करण्यामागे असे सांगण्यात येते की त्याने काही तासांपूर्वी आयएसआय लेफ्टनंट जनरल फैज हमीद यांच्या टीका केली होती.

Leave a Comment