मैदानावर जाऊन रणवीरने घेतली विराट कोहलीची गळाभेट


मुंबई – आयसीसी क्रिकेट विश्वचषक स्पर्धेतील हायव्होल्टेज मानला गेलेल्या सामन्यात भारतीय क्रिकेट संघाने पाकिस्तानवर दणदणीत विजय मिळवला. पाकिस्तानला धूळ चारल्यानंतर देशभरात एकच जल्लोष साजरा करण्यात आला. यादरम्यान आपल्या आगामी 83 या चित्रपटाच्या शुटिंगसाठी इंग्लंडमध्ये दाखल असलेल्या अभिनेता रणवीर सिंहनेही मैदानावर खेळाडूंचा उत्साह वाढविण्यासाठी हजेरी लावली होती. रणवीरने भारताच्या विजयानंतर मैदानावर जाऊन विराट कोहलीची गळाभेट घेतली.


सामन्यादरम्यान रणवीर सिंहने त्याच्या खास अंदाजात भारतीय संघातील खेळाडुंची भेट घेतली. त्याचे बरेचसे फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. यावेळी मॅन्चेस्टर मैदानावर त्याचा खास लूकही पाहायला मिळाला. नेहमीप्रमाणे यावेळीही त्याच्या लूकची चर्चा सोशल मीडियावर रंगली आहे. दरम्यान त्याने विराट कोहलीचे अभिनंदन करून त्याची गळाभेट घेतल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

आपल्या आगामी ’83’ या चित्रपटाची रणवीर लंडन येथे तयारी करत आहे. या चित्रपटात 1983 साली झालेल्या क्रिकेट विश्वचषकाचा सामना पुन्हा एकदा पडद्यावर पाहायला मिळणार आहे. या चित्रपटात रणवीर कपिल देव यांची भूमिका साकारत आहे. त्यामुळे तो सध्या भारतीय क्रिकेट संघाच्या खेळाडूंसोबत वेळ घालवत आहे.

Leave a Comment