पकिस्तानच्या टीमची दुसऱ्या दिवशी मॅच असताना सानिया सोबत पार्टी


मँचेस्टर : विश्वचषकातील पाकिस्तान विरुद्धच्या सामन्यात भारताने पाकिस्तानला 89 धावांनी पराभूत केले. त्यातच आता एका व्हिडीओमुळे पाकिस्तानी क्रिकेट रसिकांच्या संतापात आणखी भर पडली आहे. पाकिस्ताची टीम मॅचच्या आदल्या रात्री एका नाईट पार्टीत मश्गुल असल्याचे या व्हिडीओत दिसून येत आहे. शोएब मलिकची पत्नी आणि भारताची टेनिसपटू सानिया मिर्झा देखील या टीमसोबत दिसत आहे. सोशल मीडियावर हा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर क्रिकेटप्रेमींनी पाकिस्तानी क्रिकेट संघाची पुन्हा एकदा चांगलीच धुलाई केली आहे.


पाकिस्तानी खेळाडू आणि त्यांच्या बायका मँचेस्टरच्या प्रसिद्ध शीशा नाईट क्लबमध्ये गेल्या होत्या. त्यांनी तिथे मौज-मस्ती केली. व्हिडीओमध्ये काही पाकिस्तानी खेळाडू हुक्का पितानाही दिसत आहेत. या व्हिडीओवर सानियाने आक्षेप घेतला आहे. हा व्हिडीओ आम्हाला न विचारताच कुणीतरी चोरून काढला. आमच्यासोबत त्यावेळी आमची मुलेही होती हे आमच्या खासगी आयुष्यावर अतिक्रमण असल्याचेही सानियाने म्हटले आहे.

Leave a Comment