बिकीनी घातलेले फोटो सोशल मीडियावर टाकले म्हणून डॉक्टरचा परवाना रद्द


नवी दिल्ली – म्यानमारमधील मॉडेल आणि डॉक्टर nang Mwe San (नँग)चा परवाना लॉन्जरी फोटो पोस्ट केले म्हणून रद्द करण्यात आले. नँगने याचा विरोध करत ही घटना व्यक्ती स्वातंत्र्यांवर गदा आणणारी असल्याचे म्हटले. सोशल मीडियावर नँग फार सक्रिय आहे. ती स्वतःचे फोटो आणि व्हिडिओ दररोज सोशल मीडियावर शेअर करत असते.

तिने नुकतेच स्वतःचे फोटो शेअर केले. नँग या फोटोंमध्ये बिकीनीमध्ये दिसत आहे. तिने यात अमेरिकेची प्रसिद्ध मॉडेल केंडल जेनरची नक्कल केली आहे. म्यानमार मेडिकल काउंसिलला डॉक्टरचा हा लुक आपत्तीजनक वाटला. यानंतर त्यांनी ३ जूनला नँगच्या नावाचे पत्रक काढत तिचा परवाना रद्द केला. या पत्रकात म्हटले की, नँग ने घातलेले कपडे हे म्यानमार संस्कृती आणि परंपरेच्या विरुद्ध आहेत.

नँगला याआधीही जानेवारीमध्ये एक पत्रक पाठवून ताकीद देण्यात आली होती. तिला यात फेसबुकवरून तिचे फोटो काढून टाकण्यास सांगण्यात आले होते. त्या पत्रकावर नँगनेही स्वाक्षरी केली होती. पण तिने स्वाक्षरी करूनही याचे पालन केले नाही. २०१७ मध्ये २९ वर्षाच्या नँगने मॉडेलिंगमध्ये आपले करिअर सुरू करण्यापूर्वी डॉक्टर म्हणून पाच वर्ष प्रॅक्टीस केली आहे.

नँग याबद्दल सांगताना म्हणाली की, कोणतेही निर्बंध मेडिकल एथिक्समध्ये ड्रेस कोडवर नाहीत. मी अशा पद्धतीचे कपडे रुग्णांवर उपचार करताना घालत नसल्यामुळे मेडिकल काउंसिलचे हे म्हणणे मला अमान्य आहे. नँग आता मेडिकल काइंसिल विरोधात न्यायालयात जाण्याच्या विचारात आहे. मला वाटते की त्यांनी अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर गदा आणू नये. वैयक्तिक आयुष्यात मी कशी आहे याच्याशी त्यांचे काही देणे- घेणे नसल्याचेही नँग म्हणाली.

Leave a Comment