स्वीस बँक जाहीर करणार आणखी 50 भारतीयांची नावे


नवी दिल्ली – केंद्रातील मोदी सरकारच्या रडारावर काळ्या पैशाचा मुद्दा अग्रस्थानी आहे. स्वीस बँकेत काळा पैसा ठेवणाऱ्यांविरोधात भारत आणि स्वित्झर्लंडने कारवाई करायला सुरूवात केली आहे. त्यानुसार भारताकडे 50 भारतीयांची नावे ही सोपवण्यात येणार आहेत. याबाबतची माहिती भारत सरकारला देण्यापूर्वी 50 भारतीयांना अपिल करण्याची देखील संधी देण्यात आली आहे. विविध क्षेत्रामध्ये काम करणाऱ्या व्यक्तिंचा काळा पैसा असणाऱ्यांमध्ये समावेश आहे. स्वित्झर्लंडने भारतासोबत इतर देशांना देखील काळ्या पैशाची माहिती देण्याची प्रक्रिया सुरू केली आहे. भारताला काळ्या पैशाबाबत माहिती देण्याची प्रक्रिया मागील काही दिवसांमध्ये वेग धरताना दिसत आहे. देशात देखील सध्या काळ्या पैशाचा मुद्दा मोठ्या प्रमाणावर चर्चिला जात आहे.

50 भारतीयांना स्वित्झर्लंडने नोटीस पाठवली आहे. भारत सरकराला माहिती देण्यापूर्वी यामध्ये अपिलाची एक संधी देण्यात आली आहे. 11 भारतीयांना 21 मे रोजी नोटीस देण्यात आली आहे. यामध्ये 1949मध्ये जन्म झालेल्या कृष्ण भगवान रामचंद आणि 1972मध्ये जन्म झालेल्या कल्पेश हर्षद किनारीवाला यांचा समावेश आहे.

तसेच स्वीस बँकेतील खात्यासंदर्भात काही नावांचे सुरूवातीची अक्षरे समोर आली आहेत. यामध्ये 24 नोव्हेंबर 1944 रोजी जन्म झालेले एसएसबीके, 9 जुलै 1944 रोजी जन्म झालेले बीकेआय, 2 नोव्हेंबर 1983 रोजी जन्म झालेल्या पीएएस, 22 नोव्हेंबर 1973 रोजी जन्म झालेल्या आरएएस, 27 नोव्हेंबर 1944 रोजी जन्म झालेल्या एपीएस, 14 ऑगस्ट 1949 रोजी जन्म झालेले एडीएस, 20 मे 1935 रोजी जन्म झालेले एमएलए, 21 फेब्रुवारी 1968 रोजी जन्म झालेले एनएमए आणि 27 जून रोजी जन्म झालेले एमएमए यांच्या नावांचा समावेश आहे. या सर्वांना अपिलासाठी 30 दिवसांची मुदत देण्यात आली आहे.

Leave a Comment