आला पावसाळा तब्येत सांभाळा


पाऊस अद्याप पुर्णतः कार्यरत झालेला नाही. पण याच पावसाळ्याच्या दरम्यान आला पावसाळा तब्येत सांभाळा, असे म्हटले जाते. आम्ही देखील तुम्हाला पावसाळ्यात आरोग्याची काळजी घ्या. असाच काहीसा सल्ला देत आहोत. अनेक आजारांना पावसाळ्यादरम्यानच पेव फुटते आणि त्यामुळे आपल्याला डॉक्टर गाठावा लागतो. पण जर आपला आहार परिपूर्ण असेल तर आपली रोगप्रतिकारक क्षमता वाढते. तेव्हा तुम्ही सुका मेवा खा. खजूर, बदाम, आक्रोड खाण्याने तुमची रोगप्रतिकारक शक्ती वाढते. पावसाळ्यात खोकला झाला की मध आणि आल्याचे सेवन करावे त्यामुळे आराम मिळतो.

आहारात रोज फळे असावीत. पावसाळ्यात मिळणारी फळे शक्यतो खावीत. जेवणात जास्तीत जास्त हळदीचा वापर करा. त्याने रोगप्रतिकारक शक्ती वाढते. पावसाळ्यात गरम पाणी पिणे गरजेचे असते. लघू आणि गरम म्हणजेच उष्ण गुणाचा आहार या दिवसात घ्यावा. आपल्या आहारातील विविध अन्नपदार्थ तयार करण्यासाठी आपण जे धान्य वापरतो ते जुने असावे. शक्यतो एक वर्षापेक्षा अधिक जुने असू नये. नवीन धान्य वापरायचे असेल तर ते धान्य भाजून घेतल्यास अधिक चांगले असते.

पावसाळ्या दरम्यान ज्वारीची भाकरी, कमी तेलाच्या पोळ्या, गरम दुध, शक्यतो मूगाचे वरण, भात अशी आहाराची मांडणी असावी. दह्याऐवजी त्यात थोडे पाणी घालून, घुसळून ताक करून घ्यावे. दही ताजे असावे. आंबट, शिळे असू नये. पावसाळ्याच्या सुरूवातीस आहाराचे प्रमाणही अधिक असू नये.

या ऋतूमध्ये मुरे, जिरे, हिंग, सुंथ, लिंबू, लसूण कांदा, आले कडिलिंब यांचा नेहमीपेक्षा थोडा अधिकच वापर स्वयंपाकामध्ये करावा. कारण हे सर्व पदार्थ उष्ण असून; पचण्यास हलके असे आहेत. आहाराच्या पचण्यास ते खूपच मदत -साहाय्यकारी ठरतात. तेल, तूपाचा लोण्याचा वापर स्वयंपाकामध्ये जरूर असावा, पण मर्यादित स्वरूपातच असणे आरोग्यदायी असते. फळभाज्या व पालेभाज्या स्वच्छ धुवून घ्याव्यात. भेंडी, पडवळ, वांगी, कारले, दोडका, मुळा, पालक, तोंडली आदि भाज्या वापराव्यात.

Disclaimer: आरोग्य विषयक लेखात दिली गेलेली माहिती प्राथमिक स्वरुपाची आहे. हि माहिती वैद्यकीय सल्ल्याचा पर्याय होऊ शकत नाही  या माहितीचा उपयोग करण्यापूर्वी आपण डॉक्टर अथवा वैद्यकीय तज्ञाकडून खात्री करून घ्यावी. या माहितीची जवाबदारी माझा पेपर घेत नाही

Leave a Comment