बददले राजकुमार-जान्हवीच्या आगामी चित्रपटाचे नाव


पहिल्यांदाच अभिनेत्री जान्हवी कपूर आणि राजकुमार राव ही जोडी मोठ्या पडद्यावर झळकणार आहे. त्यांच्या आगामी ‘रूहअफ्जा’ या चित्रपटाच्या चित्रिकरणाला सुरुवात झाली आहे. शूटिंग सुरू झाल्याची माहिती जान्हवीने सोशल मीडियावर शेअर केली आहे. पण, या चित्रपटाच्या नावात थोडा बदल केला असल्याचे तिने शेअर केलेल्या फोटोमधून दिसून येत आहे.

या चित्रपटाचे नाव सुरुवातीला ‘रूहअफ्जा’ असे नाव असलेल्या या चित्रपटाच्या नावात आता किंचितसा बदल करण्यात आला आहे. या चित्रपटाचे नाव आता ‘रुही अफ्जा’ असे करण्यात आले आहे. क्लॅप बोर्डवर ‘रूही अफ्जा’चे चित्रपटाच्या नावात बदल झालेला दिसत आहे. जान्हवीने हा फोटो शेअर करून यावर ‘करने आ रहे है आपके अटेंशन का कब्जा, आज से शुरू होती है रुही अफ्जा’, असे खास कॅप्शनही दिले आहे.


या चित्रपटाचे दिग्दर्शन हार्दिक मेहता हे करत आहेत. तर, या चित्रपटाची निर्मिती दिनेश विजन आणि मृगदीप सिंग लांबा हे करत आहेत. यापूर्वी राजकुमार रावने दिनेश विजनसोबत ‘स्त्री’ चित्रपटात काम केले आहे. राजकुमार आणि जान्हवी ‘रुही अफ्जा’ चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहेत. उत्तर प्रदेशच्या मुरादाबाद शहरातील गोष्टीवर हा चित्रपट आधारित आहे. जान्हवीची या चित्रपटात दुहेरी भूमिका पाहायला मिळणार आहे. २० मार्च २०२० रोजी हा चित्रपट प्रदर्शित होईल.

Leave a Comment