उद्या अर्थात 16 जुन रोजी इंग्लंड येथे सुरु असलेल्या विश्वचषक स्पर्धेत दोन पारंपारिक प्रतिस्पर्धी संघ असलेल्या भारत आणि पाकिस्तान यामध्ये सामना रंगणार आहे. या हाय व्होल्टेज सामन्याची क्रिकेटप्रेमी देखील आतुरतेने वाट पाहत आहेत. भारत आणि पाकिस्तानमधील चाहत्यांनी विश्वचषकाला सुरूवात झाल्यापासून सोशल मीडियावर मिम्स, व्हिडीओ आणि जाहिरातींचा सपाटा लावला होता.
पाकिस्तानाच्या त्या जाहिरातीला भारताचे प्रत्युत्तर
भारत आणि पाकिस्तान संघ जून महिन्यातील तिसरा रविवार म्हणजे फादर्स डे आणि याच दिवशी भिडणार आहे. काही जाहिराती याचे औचित्य साधत ‘फादर्स डे’ ही थीम घेऊन तयार करण्यात आल्या आहेत. पाकिस्तानी चाहत्याने त्याला प्रतिउत्तर म्हणून कमांडर अभिनंदन आणि जाहिरात विश्वचषकाची सांगड घालत तयार केली होती. पण भारतीय चाहत्यांची मने त्या जाहिरातीमुळे दुखावली गेली होती. त्या जाहिरातीला आता भारतीयांनी देखील सडेतोड उत्तर दिले आहे.
Awesome reply by India……#INDvsPAK pic.twitter.com/TybSKAVJg9
— Harsh Goenka (@hvgoenka) June 14, 2019
ही जाहिरात उद्योगपती हर्श गोयंका यांनी ट्विट केली आहे. ती जाहिरात अनेक चाहत्यांकडून ट्विट करण्यात आली आहे. पाकिस्तानच्या चाहत्यांची या जाहिरातीनंतर बोलती बंद झाल्याच्या प्रतिक्रिया सोशल मीडिआवर येत आहेत. रविवारी होणाऱ्या भारत-पाक सामन्यापूर्वी चाहत्यांमध्ये प्रचंड उत्सुकता आहे.
दरम्यान, रविवारी मँचेस्टर येथे भारत पाकिस्तानमध्ये सामना अपेक्षित असला तरी सामना पावसामध्ये वाहून जाण्याची शक्यता आहे. हा सामना जर झाला नाही तर क्रीडारसिकांची निराशा होईल. भारत पाकिस्तान संघांमधील सामना हा नेहमीच पॉइंट टेबलचा विचार न करणारा नी ते युद्ध अनुभवायला मिळावे असाच असतो, त्यामुळे हा सामना व्हायलाच हवा अशीच सगळ्यांची इच्छा आहे.