भाजपच्या आयटी सेलच्या सदस्याला जातीयवादी पोस्ट टाकल्याप्रकरणी अटक


मोरिगाव – फेसबुकवर जातीयविरोधी पोस्ट भाजपच्या आयटी सेलचा सदस्य असलेल्या नीतू बोराने टाकल्याप्रकरणी पोलिसांनी कारवाई करताना त्याला अटक केली असून नुकतेच त्याला नोटीस देवून सोडण्यात आले आहे.

याबद्दल माहिती देताना मोरीगाव जिल्ह्यातील पोलीस आयुक्त स्वप्निल डेका यांनी सांगितले, की बोराने फेसबुकवर एका जातीविरोधात पोस्ट टाकली होती. त्याच्याविरोधात याबद्दल राजु महंता याने गुन्हा दाखल केला होता. बोराला याप्रकरणी अटक करण्यात आली होती. त्याची चौकशी करुन आम्ही त्याला नोटीस दिली आहे.

बोराने आसामचे मुख्यमंत्री सर्वानंद सोनोवाल यांच्याविरोधात यावेळी पोलिसांनी पोस्ट टाकली नसल्याचे सांगितले. पोलीस म्हणाले, याबाबत तपास सुरू आहे. आसामच्या मुख्यमंत्र्यांविरोधात बोराने काही लिहिले नाही. परंतु, फेसबुकवर त्याने जातीयवादी पोस्ट टाकली आहे.

Leave a Comment