
सातारा – विधानपरिषदेचे सभापती रामराजे नाईक निंबाळकर यांची जीभ खासदार उदयनराजे भोसले यांच्यावर टीका करताना घसरली आहे. रामराजेंनी उदयनराजेंवर टीका करताना साताऱ्यातील ३ कुत्री पिसाळलेली असून त्यांना आताच आवरा नाहीतर आपणही पिसाळलेले राजकारण करु असा इशारा दिला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार उदयनराजे भोसले यांनी नीरा देवघर पाण्यावरुन रामराजे यांच्यावर नाव न घेता टीका केली होती. रामराजेंची त्याला उत्तर देताना जीभ घसरली.
रामराजेंची जीभ उदयनराजेंवर टीका करताना घसरली
आता रामराजेंच्या या वक्तव्यामुळे नव्या वादाला तोंड फुटण्याची शक्यता आहे. साताऱ्याचे राजकारण नीरा देवघर पाण्यावरुन आता चांगलेच तापल्याचे चित्र सध्या दिसत आहे. रामराजेंनी उदयनराजेंनी केलेल्या टीकेला उत्तर देताना साताऱ्यात ३ पिसाळलेली कुत्री असल्याचे म्हणत खासदार उदयनराजे भोसले, खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर, आमदार जयकुमार गोरे यांच्यावर टीका केली.
१४ वर्षांपूर्वी दुष्काळी भागाला पाणी देण्याचे आदेश का काढले नाहीत? असा सवाल करत उदयनराजे भोसलेंनी रामराजे नाईक निंबाळकर यांच्यावर टीका केली होती. रामराजे नाईक निंबाळकर यांनी त्यावर बोलताना खालच्या पातळीवर जाऊन टीका केली.
