या देशातील राज्यात बलात्काऱ्याला केले जाणार नपुंसक


आपल्या देशात सध्याच्या घडीला हत्येंपेक्षा बलात्काराची आकडेवारी अक्षरशः सुन्न करणारी आहे. लहान चिमुरड्यांपासून मोठ्या स्त्रियांपर्यंत आजकाल कोणीही सुरक्षित नाही अशीच भावना निर्माण होते. इतरही देशांमध्ये साधारण हीच स्थिती आहे. अमेरिकेतील अलबामा राज्याने बलात्कारासारख्या घटनांना आळा बसावा म्हणून एक महत्वाचा निर्णय घेतला आहे. आता 13 वर्षाखालील अल्पवयीन मुलींवर बलात्कार झाल्यास आरोपीस चक्क नपुंसकतेचे इंजेक्शन देण्यात येणार आहे.

याबाबत अलबामा सरकारने घेतलेल्या या निर्णयानुसार, 3 वर्षाखालील अल्पवयीन मुलींवर बलात्कार केल्याच्या आरोपाखाली दोषी आढळल्यास, आरोपी पॅरोलवर असताना पुन्हा तशाप्रकारचा गुन्हा करू नये म्हणून त्याला केमिकलयुक्त इंजेक्शन देण्यात येईल. त्याला या इंजेक्शनमुळे नपुंसकत्व येऊन त्याला पुन्हा बलात्कार करण्याची इच्छा निर्माण होणार नाही. कस्टडीतून मुक्त करण्यापूर्वी अथवा पॅरोलमधून सोडण्याच्या एक महिना आधी या व्यक्तिला रासायनिक औषधाचे इंजेक्शन घेण्यात येईल. हे औषध आरोपीच्या शरीरात टेस्टोस्टेरॉन निर्माण करणार नाही.

‘केमिकल कॅस्ट्रेशन’ विधेयकाला अलबामाचे राज्यपाल यांनी मंजुरी दिली. या कठोर अपराधांची शिक्षाही कठोर असायला हवी, त्यातूनच अपराधांच्या मनात भीती निर्माण होईल असे त्यांनी सांगितले. दरम्यान, इंडोनेशिया आणि साउथ कोरिया मध्येही मुलांच्या लैंगिक शोषण प्रकरणात दोषी आढळलेल्या व्यक्तीला नपुंसक बनविले जाते.

2011 साली दक्षिण कोरिया मध्ये आणि 2016 साली इंडोनेशिया मध्ये असा कायदा लागू करण्यात आला. पण अमेरिकेतील इतर देशांनी अलबामाच्या या निर्णयाबद्दल चिंता व्यक्त केली आहे. तसेच अनेक समूहांनी या निर्णयाचा पुन्हा एकदा विचार करावा अशी अपील केली आहे.

Leave a Comment