लघुपटातून पदार्पण करणार शाहरुखची लेक ?


शाहरुख खानची कन्या सुहाना खान सोशल मीडियावर भलतीच अॅक्टीव्ह असते. सोशल मीडियाच्या माध्यमातून ती नेहमी आपले फोटो शेअर करत असते आणि ती त्यामुळे अनेकदा ट्रोल देखील होते. त्यातच आता सोशल मीडियावर तिचा एका नवीन फोटो व्हायरल झाला आहे. सोशल मीडियावर व्हायरल झालेला हा ब्लॅक अँड व्हाईट फोटो सुहानाच्या शॉर्ट फिल्म मधील आहे. हा फोटो सुहानाच्या फॅनपेजवर अपलोड करण्यात आला आहे.

View this post on Instagram

Bebe ❤ #Suhanakhan

A post shared by suhana khan ( READ BIO PLS👇) (@suhanakha2) on


या बाबत सुत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार आपल्या फ्रेंडच्या शालेय प्रोजेक्टसाठी सुहानाने ही शॉर्ट फिल्म शूट केली असून यातील सुहानाच्या कामाचे चांगलेच कौतुक झाले आहे. 19 वर्षीय सुहाना खानचे फॅन फॉलोईंग जबरदस्त असून तिच्या बॉलिवूडमधील पर्दापणाची सर्व चाहत्यांना उत्सुकता आहे. लवकरच सुहानाला बॉलिवूडमध्ये करण जोहर लॉन्च करणार अशी चर्चा सध्या सिनेवर्तुळात रंगत आहे.

Leave a Comment