समवयस्क असते तर जीभ हासडली असती, उदयनराजेंचा रामराजेंवर निशाणा


मुंबई – उदयनराजे भोसले आणि रामराजे नाईक निंबाळकर यांच्यातील वाद काही केल्या शमण्याची चिन्हे दिसत नाहीत. वयाने रामराजे नाईक निंबाळकर हे मोठे आहेत म्हणून त्यांचा मान राखला, ते जर का समवयस्क असते तर त्यांची जीभ हासडून हातातच दिली असती, असे वक्तव्य खासदार उदयनराजे भोसले यांनी केले.

राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी रामराजे नाईक निंबाळकर आणि उदयनराजे भोसले यांच्यातील वाद मिटवण्यासाठी बोलावली होती. उदयनराजे या बैठकीतून उठून गेले. उदयनराजे आणि रामराजे यांच्यातील वाद विकोपाला गेल्याचे त्यावरुनच दिसत आहे.

त्याचबरोबर पिसाळलेल्या कुत्र्यासोबत राहिलो तर मला रेबीज होईल. मी कुणाचेही ऐकून घ्यायला लेच्यापेच्या नाही. मी उदयनराजे आहे. महाराजांच्या घरात जन्म घ्यायला नशीब लागते, तसेच मी चक्रम आहे, लोकांवर अन्याय झाला की मी चक्रम होतो, असेही उदयनराजे म्हणाले. जो निर्णय शरद पवारांना घ्यायचा आहे तो घेऊ द्या, मी सहन करणार नसल्याचेही उदयनराजे यावेळी म्हणाले.

Leave a Comment