येत आहे केटीएमची नवीन स्पोर्ट्स बाईक RC125


मुंबई : लवकरच नवीन स्पोर्ट्स बाईक RC125 लाँच करण्याच्या तयारीत केटीएम ही बाईक कंपनी असून कंपनीची ही सर्वात स्वस्त बाईक असेल, असे कंपनीने म्हटले आहे. कंपनीचे 125 Duke चा फेअर्ड व्हर्जन आहे. केटीएमच्या नव्या बाईकसाठी देशभरात बुकिंग सुरु झाली आहे. बुकिंग किंमत 5 हजार रुपये ठेवण्यात आली असून नुकताच केटीएमच्या या नव्या बाईकचा टीझरही समोर आला आहे.

टीझर पाहून स्पष्ट होते की, ऑरेंज आणि ब्लॅक रंगात केटीएमची ही नवीन बाईक उपलब्ध असणार आहे. ऑरेंज रंगात या बाईकचे अलॉय व्हीलही आहेत. याशिवाय बाईक अजून एका रंगात उपलब्ध असेल. भारतात येणारे RC125 मॉडेल इंटरनॅशनल मॉडलसारखा असेल, पण फीचरमध्ये काहीतरी बदल मिळतील अशी शक्यता वर्तवली जात आहे.

टेस्टिंग दरम्यान पाहिले असता, अंडरबेली एग्जॉस्ट RC 125 मध्ये देण्यात आला आहे. इंटरनॅशनल मॉडेलमध्ये साईट माऊंटेड एग्जॉस्ट आहे. याशिवाय बाईकच्या इंडियन मॉडलमध्ये रिअर टायर हगर आणि साडी गार्ड दिला आहे. इंजिनसह अधिक फीचर RC 125 मध्ये 125 Duke मधील दिले जातील अशी अपेक्षा आहे. 125 Duke मध्ये 124.7 cc, सिंगल-सिलेंडर, DOHC, लिक्विड-कूल्ड इंजिन आहे, 14.5hp चे पॉवर आणि 12Nm टॉर्क जे जनरेट करते. आरसी 125 चे सस्पेंशन सेटअप आणि त्याची ब्रेकिंगही 125 ड्यूक प्रमाणे असतील. दरम्यान, ड्युअल चॅनल एबीएस मिळणार की सिंगल चॅनल एबीएस नवीन बाईकमध्ये मिळणार हे मात्र अजून स्पष्ट नाही. कारण 125 ड्यूक मध्ये सिंगल चॅनल एबीएस आहे.

केटीएमRC 125 च्या किमतीची माहिती समोर आली आहे. या नव्या बाईकची किंमत अंदाजे 1.5 लाख रुपये असल्याचे सांगितले जात आहे. ही किंमत 125 ड्युकपेक्षा 20 हजार रुपयांनी अधिक आहे. ही केटीएममधील सर्वात स्वस्त स्पोर्ट बाईक म्हणून भारतीय बाजारात उपलब्ध असेल.

Leave a Comment