आता नेपाळी चित्रपटात झळकणार बेबी डॉल


बॉलिवूडची बेबी डॉल अर्थात अभिनेत्री सनी लिओनने हिंदी सिनेसृष्टी गाजवल्यानंतर आता नेपाळी सिनेसृष्टीत आग लावण्यासाठी सज्ज झाली आहे. सध्या ती तिच्या दक्षिणात्य चित्रपटाच्या चित्रिकरणात व्यस्त आहे. त्याचबरोबर सनी लवकरच एका नेपाळी चित्रपटात दिसणार आहे. तिने नुकतेच ट्विटरवर तिच्या पासवर्ड या नेपाळी चित्रपटातील गाणे शेअर केले आहे.


आपल्या ट्विटमध्ये सनी सांगते, माझ्या नेपाळी ‘पासवर्ड’ चित्रपटाचे गाणं तुमच्यासोबत मी शेअर करत आहे. मी खूप खूश आहे. माझ्या नेपाळ प्रेमाबद्दल अनेकजणांना माहीत असल्यामुळेच नेपाळी चित्रपटाचा मी एक भाग बनली. मला खूप अभिमान आहे. नेपाळमधून खूप टॅलेंट समोर येत आहे.

Leave a Comment