१० व्या भारतीय चित्रपट महोत्सवाचा शाहरुख खान प्रमुख पाहुणा


भारतीय चित्रपट महोत्सवाची ऑस्ट्रेलियाच्या विक्टोरिअन सरकार द्वारा संचालित मेलबर्न येथे सुरुवात होणार असून हा महोत्सव ८ ते १७ ऑगस्टपर्यंत सुरू राहणार आहे. अभिनेता शाहरुख खानला या महोत्सवाचा प्रमुख पाहुणा निमंत्रित करण्यात आले आहे. शाहरुख या महोत्सवासाठी ऑस्ट्रेलियाला रवाना होणार आहे.

याबाबत एका माध्यमाशी बोलताना शाहरुख खानने सांगितले, की या कार्यक्रमाचे मला प्रमुख पाहुणा म्हणून निमंत्रण देण्यात आल्यामुळे मी फार आनंदी आहे. आपल्या देशाची विविधता असलेल्या चित्रपटसृष्टीचा उत्साह म्हणजेच हा महोत्सव आहे. या महोत्सवाची थिम यावर्षी ‘धाडस’ यावर आधारित आहे. मी त्यासाठीदेखील उत्साहित असल्याचे तो म्हणाला.

मेलबर्न येथे शाहरुख खानच्या ‘चक दे इंडिया’ चित्रपटाचा काही भाग हा शूट झाला होता. येथे या चित्रपटाच्याही आठवणी आहेत. यावेळी मी भारतीय चित्रपट महोत्सवाचा उत्सव साजरा करण्यासाठी आता उत्सुक असल्याचेही शाहरुख म्हणाला.

Leave a Comment