तुम्हाला माहित आहे का नेटफ्लिक्सच्या ‘या’ फिचर्सबद्दल ?


सध्याच्या घडीला आपल्या देशात ऑनलाईन मनोरंजन सुविधा देण्यात नेटफ्लिक्स आघाडीवर आहे. नेटफ्लिक्सने 2016 साली भारतात आपली सेवा युजर्ससाठी सुरु केली. तर Sacred Games ही नेटफ्लिक्सवरील वेबसीरिज प्रेक्षकांना प्रचंड आवडल्याने काही दिवसातच नेटफ्लिक्सचे सब्सक्रिप्शन घेणाऱ्यांची संख्यासुद्धा वाढत गेली. भारतात नेटफ्लिक्सवरील काही वेबसीरिज या चित्रित केल्या जात आहेत.

तसेच 11 ऑरिजनल सीरिजसह भारतात 22 ऑरिजनल चित्रपटांची घोषणा नेटफ्लिक्सने केली आहे. पण त्यासाठी युजर्सला नेटफ्लिक्सचे सब्सक्रिप्शन घेणे आवश्यक असल्यामुळे जर तुम्ही नेटफ्लिक्सचे उपभोगते असाल तर या 5 भन्नाट फिचर्सबद्दल तुम्हाला अवश्य माहिती असणे गरजेचे आहे.

बऱ्याच जणांना नेटफ्लिक्समधील ऑफलाईन फिचर्स माहिती आहे. पण तुम्ही जर विमानातून एखाद्या वेळेस प्रवास करत असल्यास तेथे इंटरनेट सुरु होत नाही. अशा वेळी नेटफ्लिक्सवरील ऑफलाईन हे फिचर तुमच्या उपयोगी पडले. तर नेटफ्लिक्सवरुन तुमच्या आवडीची कोणतीही वेबसीरिज किंवा चित्रपट डाऊनलोड करुन ऑफलाईन पाहू शकता.

आपल्या आवडीनुसार एखाद्या वेबसीरिजचे ऑप्शन नेटफ्लिक्स युजर्सला दिले जाते. तुम्ही जेणेकरुन नेटफ्लिक्सवर यापूर्वी पाहिलेल्या वेबसीरिजच्या कथेच्या अनुरुप काही वेबसीरिजचे सगेशन्स तुम्हाला दाखवले जाते. त्याचसोबत नव्याने येणाऱ्या कार्यक्रमांबद्दलसु्द्धा तुम्हाला नोटिफिकेशन मिळते.

सोशल मीडियात सध्या इन्स्टाग्रामचे युजर्स फार प्रमाणात आहेत. तर नेटफ्लिक्सच्या माध्यमातून आता तुम्ही पाहत असलेल्या वेबसीरिजचे नाव तुम्ही तुमच्या इन्स्टाग्रामवरील स्टोरीमध्ये पोस्ट करु शकता. युजर्स आपले 5 वेगवेगळे प्रोफाइल नेटफ्लिक्सवर तयार करु शकतो. त्यामध्ये लहान मुलांसाठी किड्स प्रोफाइलचे सुद्धा ऑप्शन देण्यात आले आहे.

500 रुपयांपासून भारतात नेटफ्लिक्सचे सब्सक्रिप्शन सुरु आहे. युजर्सला एका महिन्यासाठी 500 रुपये द्यावे लागतात. या सब्सक्रिप्शनच्या माध्यमातून युजर्स अनलिमिटेड सीरिज, चित्रपट, कॉमेडी आणि डॉक्युमेंट्रिज पाहायला मिळतात. तर दोन युजर्ससाठी 650 रुपये मोजावे लागतात. नेटफ्लिक्सवर सध्या वेबसिरिजच्या माध्यमातून विविध घटनांवर आधारित नव्या कथा पाहायला मिळतात.

Leave a Comment