स्वातंत्र्य दिनी होणार अक्षय-प्रभासचा आमना-सामना


मागील बऱ्याच दिवसांपासून अभिनेता अक्षय कुमारच्या ‘मिशन मंगल’ या चित्रपटाची चर्चा सुरू आहे. यावर्षीच १५ ऑगस्टला हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. पण प्रभासचा ‘साहो’ चित्रपटदेखील याच दिवशी प्रदर्शित होणार असल्यामुळे बॉक्स ऑफिसवर ‘मिशन मंगल’ आणि ‘साहो’ चित्रपटाची टक्कर पाहायला मिळणार आहे. चित्रपट निर्मात्यांनी चित्रपटाच्या प्रदर्शनाच्या तारखेत कोणताही बदल होणार नसल्याचे स्पष्ट केले आहे.

अक्षय कुमार, विद्या बालन, सोनाक्षी सिन्हा, तापसी पन्नु, नित्या मेनन, क्रिती कुल्हारी आणि शर्मन जोशी हे कलाकार ‘मिशन मंगल’ चित्रपटात झळकणार आहेत. जगन शक्ती हे या चित्रपटाचे दिग्दर्शन करत आहेत. तर, प्रभास आणि श्रद्धा कपूर ‘साहो’ चित्रपटात झळकणार आहे. नुकताच या चित्रपटाचा टीझर करण्यात आला आहे. चाहत्यांना या चित्रपटाचीदेखील उत्सुकता आहे. त्यामुळे आता स्वातंत्र्य दिनी दोन्हीही बहुप्रतिक्षीत चित्रपट प्रदर्शित होणार असल्याने बॉक्स ऑफिसवर चुरस रंगताना दिसणार आहे.

Leave a Comment