काल अभिनेता प्रभासच्या आगामी ‘साहो’ चित्रपटाचा टीझर रिलीज झाल्यानंतर तो टीझर प्रेक्षकांच्या पसंतीस उतरत आहे. हा चित्रपट १५ ऑगस्टला हिंदी, तामिळ, तेलुगु भाषेत रिलीज होणार आहे. अभिनेत्री एवलिन शर्माची हिची ‘साहो’मध्ये महत्त्वाची भूमिका आहे. सोशल मीडियावर तिने शेअर केलेला एक व्हिडिओ सध्या व्हायरल झाला आहे. ती यात एअरपोर्टवर स्टंट करताना ती दिसते.
विमानतळावरच एवलिन शर्माची स्टंटबाजी
एवलिन शर्माची ‘साहो’ चित्रपटात नेमकी काय भूमिका आहे ही बाब गुलदस्त्यात आहे. अंतिम टप्प्यात ‘साहो’ चित्रपटाचे शूटींग असून हैदराबादमध्ये शेवटचे सीन्स शूट केले जात आहेत. ‘फ्रॉम सिडनी विद लव’ या चित्रपटातून २०१२ मध्ये अभिनेत्री एवलिन शर्माने बॉलिवूडमध्ये पदार्पण केले होते. तिने त्याच वर्षी रणवीर कपूर आणि दीपिका पादुकोण यांच्या ‘ये जवानी है दीवानी’ काम केले. या चित्रपटाला भरपूर यश मिळाले आणि एवलिन शर्मा हे नाव परिचीत झाले.