देशभरातील ‘एम्स’च्या डॉक्टरांचा पश्चिम बंगालच्या डॉक्टरांच्या समर्थनार्थ संप


नवी दिल्ली – रुग्णाच्या नातेवाईकांनी पश्चिम बंगालमध्ये डॉक्टरांना मारहाण केल्यामुळे डॉक्टरांनी कामबंद आंदोलन केले आहे. यात आता दिल्लीमधील एम्स रुग्णालयातील डॉक्टरांनीही प्रथम डोक्याला पट्टी बांधत घटनेचा निषेध केला. एम्सच्या डॉक्टरांनी यावेळी थोड्यावेळाने संप करत पश्चिम बंगालमधील डॉक्टरांना समर्थन दर्शविले आहे.

गुरुवारी एम्स रेसिडेंट डॉक्टर्स असोसिएशनने (आरडीए) पश्चिम बंगालमध्ये झालेल्या घटनेचा निषेध करण्यासाठी देशभरातील डॉक्टरांना संपात सहभागी होण्यास सांगितले आहे. पश्चिम बंगालमध्ये डॉक्टरासोबत होणार मारहाण आणि वाढणारी हिंसा चिंतित करणारी आहे. येथे कायदा-सुव्यवस्था राहिली नाही. डॉक्टरांना सुरक्षा पुरवण्यात सरकार अपयशी ठरली आहे. अशा घटनांमुळे आरडीए दुखी आहे. पश्चिम बंगालमधील सहकाऱ्यांसोबत एम्स आरडीए उभी आहे.

आरडीएने यावेळी पश्चिम बंगालमधील डॉक्टरांच्या समर्थनार्थ १३ जूनला प्रदर्शन तर १४ जूनला एक दिवस संप आयोजित करण्याचे ठरवले आहे. यावेळी, आपत्कालीन विभाग सोडून ओपीडी, नियमित आणि वॉर्ड सेवा बंद राहणार आहे.

Leave a Comment