ग्राहकांसाठी जिओने आणली आणखी एक बंपर ऑफर


मुंबई : आपल्या ग्राहकांसाठी पुन्हा एकदा एक बंपर ऑफर रिलायन्स जिओने आणली आहे. जिओच्या ग्राहकांना ही ऑफर रिचार्जवर 100 टक्के कॅशबॅकप्रमाणे मिळणार आहे. 3 जूनपासून 14 जुलै 2019 पर्यंत ही ऑफर असणार आहे. जिओने याआधी क्रिकेट चाहत्यांना वर्ल्ड कप मोफत पाहण्याची सुविधा उपलब्ध करुन दिली होती.

आपला फॅशन ब्रँड अजिओच्या (AJIO) भागिदारीसह जिओने ही ऑफर आणली आहे. जिओच्या ग्राहकांना 3 जूनपासून आपल्या रिचार्जवर 100 कॅशबॅक मिळेल. रिलायन्सच्या AJIO फॅशन ब्रँडच्या खरेदीसाठी या कॅशबॅकचा उपयोग होणार आहे. 198 रुपये आणि 399 रुपयांच्या रिचार्जवर या ऑफरचा लाभ मिळेल. तुम्ही जर 198 किंवा 399 रुपयांचा जिओ रिचार्ज केला, तर तुम्हाला कॅशबॅकच्या स्वरुपात 198 रुपये किंवा 399 रुपयांचे कूपन मिळेल. तुम्ही याचा उपयोग AJIO वर शॉपिंगमध्ये करता येईल. पण यासाठी काही अटी देखील ठेवण्यात आल्या आहेत.

तुम्हाला 198 रुपयांचे कॅशबॅक कूपन वापरण्यासाठी AJIO वर कमीतकमी 999 रुपयांची खरेदी करावी लागेल. त्यानंतरच तुम्हाला 198 रुपयांच्या कॅशबॅकचा उपयोग करता येईल. म्हणजे 999 रुपयांची खरेदी केल्यानंतर तुम्हाला केवळ 801 रुपये द्यावे लागतील. तुमच्या कॅशबॅक कुपनमधून 198 रुपये घेतले जातील. याचप्रमाणे 399 रुपयांच्या कॅशबॅकचा उपयोग करण्यासाठी किमान 1,399 रुपयांची खरेदी करावी लागेल.

जूने आणि नवीन असे दोन्ही ग्राहक जिओच्या या ऑफरचा फायदा घेऊ शकतील. अशी ऑफर जिओने पहिल्यांदा डिसेंबर 2018 मध्ये नववर्षांच्या ऑफरच्या स्वरुपात आणली होती. AJIO सोबतच तेव्हाही ऑफर देण्यात आली होती. पण ही ऑफर त्यावेळी केवळ 399 रुपये आणि त्यापुढील रिचार्जवर लागू होती.

Leave a Comment