
मुंबई : फेसबुकच्या मालकीच्या असलेल्या जगातील सर्वात मोठी इन्स्टंट मेसेजिंग कंपनी व्हॉटसअॅपने नवीन फीचर लाँच केले आहे. युजर्सची या फीचरमुळे बल्क मेसेजपासून सुटका होणार आहे. तुम्हाला जे दररोज बल्क मेसेज पाठवतात अशा युजर्सचे अकाऊंट आता व्हॉटसअॅप बंद करणार आहे. यासोबतच अशा लोकांच्या विरोधात कायद्याने कंपनी कारवाईही करु शकते.
ब्लक मेसेज पाठवणाऱ्यांचे व्हॉटसअॅप अकाऊंट होणार बंद
आपल्या ब्लॉगमध्ये व्हॉटसअॅपने म्हटले आहे की, अशा लोकांचे अकाऊंट आम्ही बंद करणार आहोत, जे इतरांना बल्क मेसेज पाठवतात. 7 डिसेंबर 2019 पासून या फीचरची सुरुवात होणार आहे. व्हॉटसअॅपवर 90 टक्के खासगी मेसेज असतात, पण गेल्या काही दिवसांपासून बल्क मेसेजचा ट्रेंड सुरु झाला आहे.
राजकीय पक्ष आणि डिजीटल मार्केटिंग करणाऱ्याकडून सर्वाधिक बल्क मेसेज पाठवण्यात येत आहेत. तसेच अनेकजण या माध्यमातून फेक न्यूजही शेअर करतात. यामुळे व्हॉटसअॅपचे हे पाऊल फेक न्यूज आणि बल्क मेसेजवर आळा आणण्यासाठी मदत करेल.
व्हॉटसअॅपने म्हटले की, कोणत्या अकाऊंटवरुन जर 15 सेकंदात 100 मेसेज पाठवले जातात, तर त्या अकाऊंटला बल्क मेसेज म्हणून दोषी ठरवले जाणार आणि त्याचे अकाऊंट बद केले जाईल. तसेच अकाऊंट बनवल्यावर पाच मिनिटानंतर अनेक जणांना मेसेज पाठवल्यास कंपनी त्यांच्या विरोधात कारवाई करणार आहे. त्याचबरोबर अनेक ज्या अकाऊंटवरुन ग्रुप तयार केले जातात. उदा., जर तुमही कोणतेही व्हॉटसअॅप अकाऊंट तयार करता आणि तातडीने अनेक ग्रुप तयार करुन अनेक जण जोडले जातात, अशा अकाऊंटना कंपनी बंद करणार आहे.
