सारा अली खानला चाहत्याने केले असे प्रपोज


केदारनाथ चित्रपटातून पदार्पण केल्यानंतर अभिनेत्री सारा अली खानचा सिम्बा हा चित्रपटदेखील हिट ठरला. त्यानंतर तिचा स्वतःचा चाहता वर्ग खूप वाढला आहे. ती सोशल मीडियावरही सक्रिय असते. तिने अलिकडेच एक फोटो इन्स्टाग्रामवर शेअर केला होता. आता तो फोटो व्हायरल झाला आहे.


लाल ड्रेसमधील साराच्या या सुंदर फोटोत तिने गळ्यात सोनेरी रंगाचा नेकलेस घातला आहे. कानात मॅचिंग हइअर रिंग्ज आहेत. या फोटोला इंटरेस्टींग कॅप्शनदेखील तिने लिहिलेली आहे. भले भले फॅन्स तिच्या या फोटोवर भाळले आहेत. एकाने तर तिला चक्क प्रपोज केले आहे. माझ्यासोबत ७ फेरे घेशील का ? असे या चाहत्यांने लिहिले आहे.

सध्या ‘लव आज कल 2’ या चित्रपटात सारा अली खान काम करीत आहे. कार्तिक आर्यनसोबत यात तिची जोडी आहे. रणवीरसोबत सिम्बामध्ये पाहिलेली ऑन स्क्रिन केमेस्ट्री कार्तिक आर्यनसोबत कशी जमेल हे लवकरच कळेल.

Leave a Comment