सोनाक्षी हा चित्रपट होणार येत्या २६ जुलैला रिलीज


बॉलिवूडमध्ये ‘दबंग’ चित्रपटाद्वारे पदार्पण केलेल्या सोनाक्षी सिन्हाने आपल्या आगामी चित्रपटाची घोषणा केली आहे. ती सध्या सलमान खानसोबत ‘दबंग ३’ च्या शूटींगमध्ये व्यस्त असतानाच तिने इन्स्टाग्रामवर आपल्या नव्या चित्रपटाची घोषणा केली आहे.

एक फोटो पोस्ट करीत सोनाक्षीने नव्या चित्रपटाचे शीर्षक आणि त्याची रिलीज डेट घोषित केले आहे. ‘खानदानी शफाखाना’ असे अभिनेता वरुण शर्मा, अन्नु कपूर, शिल्पी दास,गुप्ता यांच्या भूमिका असलेल्या सोनाक्षीच्या चित्रपटाचे शीर्षक आहे. हा चित्रपट येत्या २६ जुलैला सर्वत्र रिलीज होईल. यात रॅपर बादशाहदेखील आहे.


शेअर केलेल्या फोटोच्या कॅप्शनमध्ये सोनाक्षीने लिहिले आहे, केव्हापासून विचारत आहे, चित्रपटाचे नाव काय …चित्रपटाचे नाव काय…हे मला सांगताना खूप आनंद होत आहे की, ‘खानदानी शफाखाना’ २६ जुलैला रिलीज होत आहे. तिच्या या घोषणेनंतर कॉमेंट्सचा वर्षाव सुरू झाला आहे. पण मिश्किलपणे कॉमेंट्स करीत बादशाहने आपला फोटो चांगला आला नसल्याची तक्रार केली आहे.

Leave a Comment