फेसबुकचा हा गेम खेळा आणि दिवसाला जिंका ३ लाख रुपये


मुंबई : आता भारतातील फेसबुक युजर्सनाही दिवसाला तीन लाख रूपये जिंकण्याची संधी मिळणार आहे. कॉन्फेटी हा इंटरॅक्टीव्ह गेम भारतात आणण्याचे फेसबुकने ठरवले आहे. हा खेळ बुधवार ते रविवार फेसबुकच्या व्हिडिओ प्लॅटफॉर्मवर हा खेळ लाईव्ह खेळता येईल. स्पर्धकांना यात विविध प्रश्न विचारले जातील. त्यातील विजेत्यांना ३ लाखांचे बक्षीस जिंकण्याची संधी असेल.

हा गेम सर्वप्रथम अमेरिकेत लाँच करण्यात आल्यानंतर युके, कॅनडा, मेक्सिको, थायलंड, व्हीएटनाम आणि फिलीपाईन्स या देशातही त्याचा प्रसार झाला. कॉन्फेटी हा जागतिक स्तरावरचा खेळ असेल पण खेळाचा अनुभव हा संपूर्णतः भारतीय असेल असा प्रयत्न फेसबुकने केल्याचे फेसबुक इंडियाने म्हटले आहे.

याबाबत माहिती देताना फेसबुकचे अधिकारी मनीष चोपडा यांनी म्हटले की, भारतातील हा आमचा पहिला ऑफिशियल शो आहे. हे पाहण्यासाठी आम्ही उत्सुक आहोत की, आणखी चांगल्या प्रकारे युजर्सला जोडण्यासाठी आणि ग्रुप्सला फेसबुकवर वेगळ्या आणि इंटरॅक्टिव्ह व्हिडिओचा अनुभव देण्यासाठी हा सक्षम काम करेल.

Leave a Comment