प्रियंकाला ‘यूनीसेफ’ करणार सन्मानित


आपल्या वैयक्तिक किंवा सोशल लाईफमुळे बॉलीवूडची देसी गर्ल अर्थात प्रियंका चोप्रा नेहमीच चर्चेत असते. पण यावेळी ती एका वेगळ्या घटनेमुळे चर्चेत आहे. युनिसेफने काही दिवसांपूर्वीच प्रियंकाची सदिच्छा दूत म्हणून नियुक्ती केली होते. पण आता डिसेंबर महिन्यात यूनीसेफच्या स्नोफ्लेक बॉल सोहळ्यात ‘डॅनी केये ह्यूमनटेरियन’ या पुरस्काराने यूनीसेफकडून प्रियंका चोप्राला सन्मानित केले जाणार आहे. याबाबतची माहिती सोशल मीडियावर खुद्द प्रियंकाने दिली आहे.

तीन डिसेंबर रोजी न्यूयॉर्कमध्ये या सोहळ्याचे आयोजन केले जाणार आहे. यूनीसेफसाठी त्यांचे काम अतिशय महत्त्वाचे असल्याचे प्रियंकाने म्हटले आहे. यूनीसेफसह मी जगातील संपूर्ण मुलांसाठी करत असलेले काम माझ्यासाठी सर्व काही आहे. जगातील सर्व मुलांना शांती, स्वातंत्र्य आणि शिक्षणाचा अधिकार असल्याचेही प्रियंकाने म्हटले आहे.


२००६ पासून प्रियंका यूनीसेफशी जोडली आहे. प्रियंकाला २०१० आणि २०१६ मध्ये बाल हक्कांसाठी राष्ट्रीय आणि जागतिक यूनीसेफ सदिच्छा दूत म्हणून नियुक्त केले होते. पर्यावरण, आरोग्य, शिक्षण, महिलांचे अधिकार, लैंगिक समानता याबाबत प्रियंका नेहमीच बोलत असते.

Loading RSS Feed

Leave a Comment