किम जोंग उनने जनरलला फेकले हिंस्र माशांच्या तलावात


प्योंगयोंग : आपल्या क्रुरपणासाठी उत्तर कोरियाचा हुकूमशाह किम जोंग उन प्रसिद्ध आहे. त्याच्या क्रूरतेचे आणखी एक उदाहरण सध्या चर्चेत आहे. यासंदर्भात ब्रिटनमधील डेली स्टारने दिलेल्या वृत्तानुसार, आपल्या एका जनरलला पिऱ्हाना माशांच्या तलावात फेकून किमने मृत्यूदंड दिला. पिऱ्हाना हा जगातील सर्वात हिंस्र मासा समजला जातो.

प्योंगयोंगमधील आपल्या रॉन्गसॉन्ग या निवासस्थानी किमने एक मोठा तलाव बनवला आहे. त्याने या तलावात माणसांना आपल्या दातांनी जिवंत फाडून खाणाऱ्या पिऱ्हाना माशांना पाळले आहे. आपल्याविरोधात जनरल षडयंत्र रचत असल्याचा संशय लक्षात येताच, त्याचे हात आणि धड किमने वेगळे केले आणि पिऱ्हाना माशांच्या तलावात फेकले.

पण पिऱ्हाना माशांच्या हल्ल्यात की त्याआधीच जनरलचा मृत्यू झाला हे अद्याप समजू शकलेले नाही. केवळ उत्तर कोरियातच नाही तर जगभरात किमच्या या क्रूरतेची चर्चा आहे. मात्र या जनरलचे नाव प्रकाशित केलेले नाही.

ब्राझीलवरुन किम जोंग उनने हे पिऱ्हाना मासे मागवले होते. पिऱ्हानाची हिंस्र मासा अशी ओळख आहे. या माशाचे दात एवढे तीक्ष्ण असतात की, अवघ्या काही सेकंदात हा मासा माणसाची चिरफाड करु शकतो. या माशांची जगभरात ओळख शाकाहारी अशीच आहे. पिऱ्हानाच्या सुमारे 60 वेगवेगळ्या प्रजाती संपूर्ण जगभरात आढळतात.

Leave a Comment