लिओनार्डो दा विंचीच्या पेंटिंगसाठी सौदीच्या प्रिंसने मोजले तब्बल 3125 कोटी रूपये


वॉशिंग्टन- कलेच्या दुनियेतील सगळ्यात उत्कृष्ट मानली जाणारी लिओनार्डो दा विंचीची पेंटिंग ‘सल्वाटोर मुंडी’चा ठाव ठिकाणा अखेर लागला असून यासंदर्भात एका वेबसाइटने असा दावा केला आहे की, सौदी अरबचे प्रिंस सलमान यांच्या यॉटवर जगातील ही सर्वात महागडी पेटिंग आहे. ही पेंटिंग 2017 मध्ये झालेल्या लिलावात 45 कोटी डॉलर (3125 कोटी रुपये) मध्ये विकली गेली होती. पण, तेव्हा पेटिंग विकत घेणारा आणि ही पेंटिंग कुठे जात आहे, याचा खुलासा झाला नव्हता.

अमेरिकेतील वेबसाइट आर्टन्यूजमध्ये सोमवारी लिहीलेलेल्या एका आर्टिकलमध्ये लंडनचे आर्ट डीलर केनी शेक्टरने सांगितले की, सध्या गरगंतुआन यॉटवर पेटिंग आहे. सौदी किंग सलमान बिन अब्दुलअजीज अल सऊद यांचे सुपूत्र आणि क्राउन प्रिंस मोहम्मद बिन सलमान अल सौदचे हे यॉट आहे.

आपल्या लेखात शेक्टरने सुत्रांकडून कळाले आहे असे लिहीत सांगितले आहे की, प्रिंस सलमानने पेंटिंगवर बोली लावल्यानंतर तत्काळ त्या पेटिंगला सऊदीला नेले होते आणि आपल्या यॉटमध्ये तिला लावले. पण ती पेंटिंग आता लवकरच अल-उला शहराच्या गव्हर्नरच्या ऑफिसमध्ये लावली जाणार आहे, ज्याला अनेक दिवसांपासून सांस्कृतिक आणि पर्यटन स्थळ बनवण्याचा विचार सऊदी सरकार करत आहे.

अमेरिकेतील न्यूज ग्रुप वॉल स्ट्रीट जर्नलने पहिल्यांदाच खुलासा केला होता की, सौदी प्रिंस बद्र बिन अब्दुल्लाने पेंटिंगला खरेदी केले होते, जे त्यावेळी सौदी क्राउन प्रिंसचे प्रतिनिधी म्हणून लिलावत आले होते. रियादकडून तेव्हा याबाबत कोणतेही स्पष्टीकरण आले नव्हते. पण अनेक एक्सपर्ट पेटिंग खरी असल्यावर संशय व्यक्त करतात. त्यांचे असे म्हणने आहे की, सल्वाटोर मुंडीला लिओनार्डोने नाही तर त्यांच्यासोबत काम करणाऱ्या त्यांच्या सहकाऱ्याने बनवले होते.

Leave a Comment