देसी गर्ल प्रियंकाला खावा लागला होता चक्क एका माकडाकडून मार


आपल्या बालपणीचे अनेक किस्से बॉलिवूड कलाकार नेहमीच त्यांच्या चाहत्यांशी शेअर करत असतात. त्यांचे चाहते देखील आपल्या आवडत्या कलाकाराच्या आयुष्यातील अशाप्रकारच्या चटपटीत आणि कधीही न ऐकलेली गुपित जाणून घेण्यासाठी नेहमीच उत्सुक असतात. देसी गर्ल प्रियंका चोप्राने सुद्धा 2017मध्ये कपिल शर्माच्या कॉमेडी शोमध्ये असाच एक आपल्या बालपणीचा किस्सा शेअर केला होता. प्रियंकाने यावेळी मी लहान असताना एकदा एका माकडाने तिच्या कानाखाली मारल्याचा एक विनोदी किस्सा शेअर केला.


प्रियंकाने तिच्या बालपणीचा हा मजेदार किस्सा कपिल शर्माच्या शोमध्ये शेअर केला. प्रियंका म्हणाली, त्यावेळी मी लखनऊमध्ये तिसऱ्या इयत्तेत शिकत होते. आमच्या शाळेजवळ एक झाड होते ज्यावर खूप माकड येत असत. एक माकड झाडावर बसून स्वतःला साफ करत होते ते पाहून मला खूप विनोदी वाटले आणि तिला पाहून जोरजोरात हसू लागले. त्या माकडाने हे पाहिले, ते खाली आले, त्याने पुन्हा एकदा माझ्याकडे पाहिले आणि माझ्या कानाखाली मारली आणि पुन्हा झाडावर जाऊन बसले. हा किस्सा ऐकल्यावर मात्र प्रेक्षकांना हसू आवरता आले नाही.

Leave a Comment