विराटच्या कोचने बॅडमिंटनपटूला बनवले क्रिकेटपटू


वर्ल्डकपसाठीच्या महिला संघात महिला क्रिकेट चॅम्पियनशिपमध्ये गुजरात आणि तामिळनाडुविरुद्ध शतकी खेळी करणाऱ्या प्रिया पुनियाची निवड झाली आहे. 22 वर्षीय प्रिया पुनिया राजस्थानची आहे.

गेल्या वर्षी भारताच्या महिला टी20 संघात राजस्थानातील चूरु जिल्ह्यात जनाऊ खारी गावातून आलेल्या प्रियाची निवड झाली आहे. पहिल्यांदा प्रियाला बॅडमिंटन खेळायला आवडत होते. पण तिने नंतर सुराणा अॅकडमीत क्रिकेटचे धडे गिरवायला सुरुवात केली.

जयपूरमध्ये भारतीय सर्वेक्षण विभागात प्रिया पुनियाचे वडील सुरेंद्र पुनिया हेड क्लार्क म्हणून काम करतात. प्रियासाठी तिच्या वडीलांनी जयपूरमध्ये सिकर रोडवर एक मैदानही तयार केले आहे. प्रियाचे कुटुंबीय जयपूरमध्ये 6 महिन्यांच्या प्रशिक्षणानंतर दिल्लीला आले. प्रियाने तेव्हा राजकुमार शर्मा यांच्या अॅकॅडमीत सरावाला सुरुवात केली.

भारताचा कर्णधार विराट कोहलीचे 2008 ते 2015 या कालावधीत प्रशिक्षक असलेल्या राजकुमार यांच्याकडून प्रियाने प्रशिक्षण घेतले. जीजस अॅण्ड मेरी कॉलेजमधून प्रियाने तिचे शिक्षण केल आहे. ती सध्या जयपूरमध्ये राहते. सलामीला फलंदाजी करणारी प्रिया आतापर्यंत फक्त दिल्लीकडून खेळली आहे.

प्रियाने बेंगळुरुत सिनीअर महिला वनडे चॅम्पियनशिप स्पर्धेत दिल्लीकडून खेळताना ८ सामन्यात 50 च्या सरासरीने 407 धावा काढल्या होत्या. प्रियाने तामिळनाडूविरुद्ध 143 आणि गुजरातविरुद्ध 125 धावा काढल्या होत्या. त्यानंतर तिचा समावेश भारताच्या महिला टी20 संघात करण्यात आला होता. आतापर्यंत प्रिया दिल्लीकडून अंडर-19, अंडर-23 आणि सिनिअर गटातून खेळली आहे.

Leave a Comment