का बरे सोशल मीडियात ट्रोल होत आहे मलायका


बॉलिवूडमधील सर्वात फिट आणि लोकप्रिय अभिनेत्रींमध्ये मलायका अरोराची गणती होते. सध्या ती तिच्या फिटनेसमुळे यूथ आयकॉन बनली आहे. सोशल मीडियावर तिचा कोणताही फोटो चर्चेचा विषय ठरतो.


मलायका फिटनेससाठी फक्त जिमच नाही तर योगा सुद्धा करते. तिच्या इन्स्टाग्रामवर नुकताच तिने योगा पोझमधला एक फोटो शेअर केला. तिला ज्यावरून ट्रोल केले जात आहे. त्या फोटोत ती ब्लू लाइटमध्ये योगा करताना दिसत आहे. मात्र मलायकाच्या या फोटोवरून काही लोकांनी तिला ट्रोल करायला सुरुवात केली आहे. हा फोटो शेअर करताना मलायकाने लिहिले, तुम्ही कोणत्याही गोष्टीत प्रयत्न करून प्राविण्य मिळवू शकता. सध्या वर्क इन प्रोग्रेस मोडवर मी असून योगा आणि कसरती सोबत या आठवड्याची सुरुवात करत आहे.


पण काही युजर्सनी पुन्हा एकदा मलायकावर निशाणा साधला आहे. या फोटोला त्यांनी अश्लील म्हटले आहे. खरं तर तसं या फोटोमध्ये काहीही नाही. पण काही लोकांनी मात्र मलायकाच्या या फोटोचे कौतुक केले आहे. मलायकाची बाजू घेत एका चाहत्याने म्हटले, आपण जर तिच्यासारखा योगा करु शकत नसू तर तिच्यावर टीका करण्याचा आपल्याला काहीही अधिकार नाही.


याशिवाय मलायका वयाच्या 45 व्या वर्षीही इतर अभिनेत्रींच्या तुलनेत खूपच फिट आहे आणि सध्याच्या यूथची आयकॉन आहे. ही गोष्टही सर्वांनी मान्य केली. आपल्या फिटनेससाठी मलायका खूप मेहनत घेते. फक्त जिम आणि योगा नाही तर ती तिच्या खाण्यापिण्यावरही विशेष लक्ष देते. तसेच ती उत्तम डान्सर सुद्धा आहे आणि सध्या एका टीव्ही शोमध्ये परिक्षक म्हणून काम पाहत आहे.

Leave a Comment