या अभिनेत्रीला डेट करत आहे जसप्रित बुमराह?


क्रिकेट आणि सिनेसृष्टीचे एक जवळचे नाते आहे. कित्येक क्रिकेटर्सने बॉलिवूडमधील अभिनेत्रींशी लग्न केले आहे. त्यातच आता एका अभिनेत्रीसोबत टीम इंडियाचा वेगवान गोलंदाज जसप्रित बुमराहचे नाव जोडले जात आहे. बुमराहला दाक्षिणात्य अभिनेत्री अनुपमा परमेश्वरन डेट करत असल्याची चर्चा होत आहे. अजून कोणत्याही बॉलिवूड अभिनेत्रीला बुमराहने फॉलो केलेले नाही. पण त्याने पहिल्यांदाच अनुपमाला फॉलो केले आणि त्यांच्या अपेअरची चर्चा सुरु झाली.

2015 मध्ये मल्याळम चित्रपट ‘प्रेमम’मधून अनुपमाने पदार्पण केले होते. यानंतर 2016 मध्ये तेलगू चित्रपटात छाप सोडली. ती सध्या सहाय्यक दिग्दर्शक म्हणून सलमान दुलकरच्या प्रोडक्शनमध्ये काम करत आहे.

दरम्यान, एखाद्या अभिनेत्रीशी बुमराहचे नाव जोडलं जाण्याची ही पहिलीच वेळ नाही. बुमराह यापूर्वीही अभिनेत्री राशी खन्नासोबत रिलेशनशीपमध्ये असल्याची चर्चा होती. पण बुमराह फक्त एक चांगला खेळाडू आहे, त्यापलिकडे मी त्याला ओळखत नसल्याचे राशी म्हणाली आणि या चर्चांना पूर्ण विराम मिळाला.

जागतिक क्रिकेटमध्ये बुमराहने स्वतःचे वेगळे स्थान निर्माण केले आहे. तो टीम इंडियाचा स्टार गोलंदाज आहे. आयपीएलमध्ये दमदार गोलंदाजी केल्यानंतर हेच प्रदर्शन विश्वचषकातही सुरुच आहे. दक्षिण आफ्रिका आणि ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या सामन्यांमध्ये बुमराहने त्याची कामगिरी दाखवून दिली आहे.

Leave a Comment