लवकरच सुरु होणार राफेलची डिलिव्हरी


नवी दिल्ली – फ्रान्सचे परराष्ट्र मंत्री जीन लेमोईन भारत-फ्रान्स मधील द्विपक्षीय संबंध सुधारण्यासाठी भारत दौऱ्यावर असून यादरम्यान लेमोईन म्हणाले, काही महिन्यांमध्ये भारतात राफेल लष्करी विमानाला पोहचवले जाणार आहे. १-१ करुन सर्व राफेल विमाने भारतात पोहचवली जाणार आहेत.

भारताचे परराष्ट्र राज्यमंत्री वी. मुरलीधरन यांची लेमोईन यांनी भेट घेतली. त्यांनी या भेटीत भारत-फ्रान्सच्या राजकीय संबंध मजबूत करण्याबाबत चर्चा केल्यानंतर, परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर यांचीही त्यांनी भेट घेतली. यानंतर लेमोईन पत्रकारांशी बोलताना म्हणाले, मोदी आणि मॅक्रॉन यांच्यात जी-७ शिखर परिषदेत भेट होईल. दोन्ही देशांतील करारांवर या भेटीत स्वाक्षऱ्या केल्या जाण्याची शक्यता आहे. फ्रान्स दहशतवाद्याच्या मुद्यावर नेहमी भारतासोबत उभा आहे. दहशतवाद हा प्रत्येक देशासाठी धोकादायक आहे.

फ्रान्समध्ये शिक्षण घेतलेल्या विद्यार्थ्यांशी जीन लेमोईन यांनी दिल्लीत संवाद साधला. त्यांनी यावेळी फ्रान्समध्ये शिक्षण घेण्यासाठी विद्यार्थ्यांना आमंत्रित केले आहे. आतापर्यंत फ्रान्समधून जवळपास ८ हजारांपेक्षा जास्त विद्यार्थ्यांनी शिक्षण घेतले आहे.

Leave a Comment