‘भारत’ची ही अभिनेत्री बँकॉकच्या गल्लीत विकत आहे कपडे


बॉक्स ऑफिसवर सलमान खानच्या भारत चित्रपटाने 150 कोटींचा गल्ला पार केला असून या चित्रपटाला प्रेक्षकांकडून खूप प्रतिसाद लाभत आहे. पण बँकॉकच्या गल्लीत कपडे विकण्याची वेळ या चित्रपटातील एका अभिनेत्रीवर आली आहे. सध्या बँकॉकमध्ये अभिनेत्री नोरा फतेही असून त्या ठिकाणी ती कपडे विकत असतानाचा एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. बँकॉकच्या लोकल मार्केटमधील हा व्हिडिओ असल्याचे बोलले जात आहे.

सलमान खानने त्याच्या ‘भारत’ चित्रपटामध्ये नोरा फतेहीला संधी दिली. या चित्रपटामधील ‘तुर्पेआ’ या गाण्यावर नोराने डान्स केला असून तिने याव्यतिरिक्त या चित्रपटामध्ये अभिनय सुद्धा केला आहे. पण नोरा आता बँकॉकमध्ये कपडे विकताना दिसल्याने तिचे चाहते सुद्धा अवाक झाले आहे. नोरा सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या या व्हिडिओमध्ये पीच कलरचे टी-शर्ट आणि शॉर्ट्समध्ये असून ती एका ग्राहकाला हिरव्या रंगाची शॉर्ट पॅन्ट दाखवताना दिसत आहे.


नो मेकअप लुकमध्ये नोरा यावेळी होती. त्यामुळे ती हुबेहूब एखाद्या सेल्सपर्सन दिसत आहे. कपड्यांचा ढीग तिच्या आजूबाजूला पडला आहे आणि यातील सर्वात खास गोष्ट अशी की नोरा चक्क तेथील स्थानिक भाषेत ग्राहकांशी डील करताना दिसत आहे.

सलमानच्या ‘भारत’ चित्रपटामध्ये नोरा फतेहीने एका लॅटिन अमेरिकन मुलीची भूमिका साकारली आहे. माल्टा येथे नोराच्या या भूमिकेचे सर्व शूटिंग झाले असून नोरा ‘भारत’ मधील या भूमिकेसाठी लॅटिन अमेरिकन भाषा सुद्धा शिकली. नोराच्या दिलबर गाण्याने सोशल मीडियावर अक्षरशः धुमाकूळ घातला होता. तिचा हा व्हिडिओ 12 कोटीपेक्षा जास्त लोकांनी पाहिला आहे. वरुण धवन आणि श्रद्घा कपूर सोबत नोरा लवकरच स्ट्रीट डान्सर चित्रपटामध्ये दिसणार आहे. हा चित्रपटा 24 जानेवारी 2020ला रिलीज होणार आहे.

Leave a Comment