अतिशहाण्या महिलेने टॉयलेटचा दरवाजा समजून उघडला विमानाचा इमरजन्सी दरवाजा


आपल्यापैकी जर कोणी विमानाने प्रवास करत असेल आणि आपल्यापैकीच कुण्या शहाण्याने उडत्या विमानाचा इमरजन्सी दरवाजा उघडला तर आपली परिस्थिती काय होईल याचा अंदाज देखील लावता येणार नाही. पण आम्ही जे तुम्हाला सांगत आहोत, ते खरोखर घडले आहे. विमानाचा आपातकालीन दरवाजा एका महिलेने उघडला आणि प्रवाशांमध्ये एकच गोंधळ उडाला.

विमानाचा आपातकालीन दरवाजा पीके ७०२ क्रमांकाच्या आंतरराष्ट्रीय विमानात प्रवास करणाऱ्या एका पाकिस्तानी महिलेने चुकून उघडल्यानंतर काय आरामात प्रवासाची अपेक्षा करत असलेल्या प्रवाशांमध्ये एकच गोंधळ उडाला. त्या महिलेने आपातकालीन दरवाजा टॉयलेटचा दरवाजा म्हणून उघडला होता.

शनिवारी सकाळी मॅनचेस्टर एअरपोर्टवर पाकिस्तानची राष्ट्रीय विमान कंपनी पाकिस्तान इंटरनॅशनल एअरलाइन्सचं पीके ७०२ हे विमान उभे होते. विमानातील एका महिलेने यादरम्यान बटन दाबले आणि आपातकालीन दरवाजा उघडला गेला. याबाबत पीआयएच्या प्रवक्त्यांनी सांगितले की, विमान या घटनेमुळे सात तास लेट झाले. इमरजन्सी स्लोप महिलेच्या चुकीमुळे सक्रिय झाला. या घटनेनंतर लगेच स्टॅंडर्ड ऑपरेशन प्रोसीजरनुसार, साधारण ४० प्रनाशांना त्यांच्या सामानासोबत खाली उतरवण्यात आले. या घटनेची चौकशी करण्याचे आदेश पीआयएने दिले आहेत. या घटनेच्या कारणाचा शोध घेतला जात आहे. तर दुसरीकडे महिलेने हे स्पष्ट केलं आहे की, तिने टॉयलेटचा दरवाजा समजून बटन दाबलं होतं.

Leave a Comment