कोट्यावधीच्या बीएमडब्ल्यूमध्ये पेट्रोल भरण्यासाठी तो करत होता कोंबड्यांची चोरी!


जोश जोशमध्ये चीनमधील एका श्रीमंत शेतकऱ्याने २ कोटींची बीएमडब्ल्यू कार विकत घेतली. त्या कारच्या निमित्ताने त्याने काही दिवस मस्त हवा केली. पण कारमध्ये पेट्रोल भरून भरून त्याच्या नाकी नऊ आले. कार तर आता घेतली आहे आणि फिरायचे देखील आहे. त्यासाठी या शेतकऱ्याने लोकांच्या घरातील कोंबड्या आणि बदक चोरीचा धडाका लावला. तो त्याच्या बीएमडब्ल्यूची पेट्रोलची तहान या कोंबड्या आणि बदक विकून भागवत होता. पण त्याला अखेर पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत.

रिपोर्ट्सनुसार, एप्रिल महिन्यापासून सिचुआन प्रांतातील Linshui County गावातील पक्ष्यांची चोरी करत होता. पोलिसांनी त्याला पकडल्यानंतर त्याने आपला गुन्हा कबूल केला. पोलिसांनी सांगितले की, ही चोरी त्याने त्याच्या बीएनडब्ल्यूमध्ये पेट्रोल भरण्यासाठी केली होती.

या संदर्भात स्थानिक मीडिया रिपोर्ट्सनुसार, आपल्या बाइकने ही व्यक्ती रात्री उशीरा कोंबड्यांची चोरी करायला जात असे. पकडला गेल्यावर कोंबड्या आणि बदक त्याचे असल्याचे सांगत होता. पण पोलिसांनी जेव्हा गावातील वेगवेगळ्या ठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरे लावले, तेव्हा त्याची चोरी लपू शकली नाही. पोलिसांनी २२ मे रोजी त्याच्या कारचा पाठलाग केला. पण पोलिसांना मागे टाकत तो पळून गेला. पोलिसांनी यावर सांगितले की, बीएमडब्ल्यूमध्ये तो होता आणि वेगाने जात होता. त्यामुळे आम्ही त्याला पकडू शकलो नाही. पण नंतर त्याला पोलिसांनी त्याच्या घरातून अटक केली.

Leave a Comment