‘भूलभूलैया’च्या सिक्वेलमध्ये झळकू शकतात हे कलाकार


अक्षय कुमार, शाईनी आहुजा आणि विद्या बालन अभिनित भूलभूलैया चित्रपटाला प्रेक्षकांनी भरपूर प्रेम दिले होते. आता त्यानंतर या चित्रपटाचा सिक्वेल आता प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. त्यातच या सिक्वलमधील कलाकारांबद्दल प्रेक्षकांच्या मनात उत्सुकता निर्माण झाली होती.

या चित्रपटातील मुख्य भूमिकेसाठी आता तीन आभिनेत्यांची नावे समोर येत आहेत. या रोलसाठी राजकुमार राव, विकी कौशल आणि आयुष्मान खुराणा यांची नावे शॉर्टलिस्टेट झाल्याचे वृत्त समोर आले आहे. या तिन्ही कलाकारांची स्क्रीन टेस्ट होणार असून यातूनच एका अभिनेत्याची निवड करण्यात येणार असल्याचे म्हटले जात आहे.

याबाबत मिळालेल्या माहितीनुसार सध्याच्या घडीला हे तिन्ही कलाकार आघाडीवर असून त्यांच्या चित्रपटांची बॉक्स ऑफिसवरील कमाल पाहता निर्मात्यांना यातील कोणा एकाचीच निवड करणे खूप अवघड जात आहे. अशात आता चित्रपटात नेमकी वर्णी लागणार हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.

Leave a Comment