ऋतिकने करून दिली ‘सुपर ३०’ मधील त्याच्या विद्यार्थ्यांची ओळख


लवकरच ‘सुपर ३०’ चित्रपटातून अभिनेता ऋतिक रोशन प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. हा चित्रपट गणिततज्ञ आनंद कुमार यांच्या जीवनावर आधारित असणार असून या चित्रपटात त्यांच्या मार्गदर्शखाली शिकलेल्या ३० विद्यार्थ्यांची कथा पाहायला मिळणार आहे.


चित्रपटातील नवनवीन फोटो काही दिवसांपासूनच प्रेक्षकांच्या भेटीला येत आहेत. ऋतिकने आता चित्रपटातील आपल्या विद्यार्थ्यांसोबतचा आणखी एक फोटो शेअर केला आहे. ऋतिकने या फोटोला कॅप्शन देत या विद्यार्थ्यांची ओळखही करून दिली आहे.


फोटोत ऋतिकच्या समोर एक मुलगा बसला आहे. ज्याची ऋतिक प्रेक्षकांना ओळख करून देत आहे. हा आहे बाँके, खिशात नेहमी वॉलेट ठेवतो, ते ही रिकामे…यामागचे मी कारण विचारले तर म्हणतो सवय करून घेतो आहे, असे ऋतिकने म्हटले आहे. तर माझ्या मागे बसलेल्या मुलाचे नाव फुग्गा आहे. क्लासमध्ये प्रवेश घेण्यासाठी याने आपल्या शेजारच्यांच्या कोंबड्या विकल्या…भेटा माझ्या सुपर ३० मुलांना, असे म्हणत आपल्या सुपर ३० विद्यार्थ्यांची बिकट परिस्थिती आणि त्यातही त्यांनी मिळवलेल्या यशाबद्दल माहिती ऋतिकने दिली आहे.

Leave a Comment